Kurla Best Bus Accident : मृत्यू सात, कुणामुळे घात? ड्रायव्हर की 'बेस्ट'? Special Report
सोमवारी रात्री मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसचा एक भीषण अपघात घडला. या अपघातात सात जणांचा जीव गेला तर अनेक जण गंभीर जखमी झालेयत. पण या अपघातानंतर आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालंय. हा अपघात नेमका का घडला? यात दोषी कोण? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध सुरु आहे. पण या अपघातामुळे बेस्ट प्रशासनाच्या कारभारावही प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय... पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट....
मुंबईच्या कुर्ला स्टेशनबाहेर
सोमवारी रात्री बेस्टची एक बस
भरधाव वेगानं आली....
आणि क्षणात एक भीषण अपघात घडला....
या अपघातात काही जणांनी जीवही गमावला...
तर अनेक जण गंभीर जखमी आहेत...
पण या अपघातानंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय
कुर्ल्यातील अपघातासाठी कारणीभूत ठरलेला बेस्ट बसचालक सुनील मोरे
हा कंत्राटी तत्वावर कामाला होता...
बेस्टला चालक पुरवणाऱ्या याच कंपनीवर
राजकीय वरदस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केलीय...