Shubman Gill : युवा सलामीवीर शुभमनची कमाल, नावावर केला वन-डे क्रिकेटमधील खास रेकॉर्ड
ODI Record : भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याने एकदिवसीय सामन्यांच्या 10 व्या डावात 500 धावा करत सर्वात वेगाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्याचा रेकॉर्ड पूर्ण केला आहे. त्याने नवज्योत सिंह सिद्धू यांना मागे टाकलं आहे.
Shubhman Gill Special ODI Record : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) पहिल्या एकदिवसीय मालिकेत भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तो केवळ 3 धावा करुन बाद झाला असला तरी त्याने भारताकडून एकदिवसीय सामन्यांच्या 10 डावात 500 धावा पूर्ण करत सर्वात वेगाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा करण्याचा रेकॉर्ड पूर्ण केला आहे. त्याने माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना मागे टाकलं आहे.
भारताने 2018 साली अंडर 19 विश्वचषक (2018 Under 19 World Cup) जिंकला तेव्हा मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा शुभमन मागील काही वर्षात दमदार खेळीमुळे एक आघाडीचा खेळाडू बनला आहे. केकेआरकडून आयपीएल (IPL) गाजवल्यानंतर यंदा आयपीएल 2022 (IPL 2022) चा विजयी संघ गुजरात टायटन्सकडूनही शुभमनने चांगली कामगिरी केली. ज्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत गिलला संधी मिळाली आहे. पहिल्याच सामन्यात तो 3 धावांवर बाद झाला. पण पहिली धाव घेताच त्याने सर्वात कमी एकदिवसीय सामन्यांच्या डावात 500 धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने 10 वन डे सामन्यांच्या डावात 500 रन केले आहेत. याआधी 9 एकदिवसीय सामन्यांच्या डावात त्याने 499 रन केले होते. ज्यानंतर आता केलेल्या 3 धावांनी त्याने 10 डावांत 502 धावा नावावर केल्या आहेत.
नवज्योत सिंह सिद्धूंना टाकलं मागे
शुभमनने क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू यांचा रेकॉर्ड तोडला आहे. सिद्धू यांनी 11 वन डे डावांत 500 रन पूर्ण केले होते. पण 10 डावांत 500 धावा पूर्ण करत शुभमनने नवज्योत सिंह सिद्धू यांना मागे टाकलं आहे. तर या यादीत तिसऱ्या स्थानावर गब्बर क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) विराजमान आहे. त्याने 13 वन डे डावांत 500 रन केले आहेत. तर केदार जाधव (Kedar Jadhav) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनीही 13 डावात ही कमाल केली आहे.
हे देखील वाचा-