(Source: ECI/ABP News/ABP Majha)
James Anderson : 'असे काही करण्याचा विचारही करणार नाही, आऊट करायची ही भित्री पद्धत', दीप्ती शर्माने केलेल्या 'त्या' रनआउटवर जेम्स अँडरसनची प्रतिक्रिया
भारत-विरुद्ध इंग्लंड महिला संघात पार पडलेल्या यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) अनोख्या पद्धतीनं धावबाद केल्यामुळें वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
James Anderson on Deepti Sharma : भारत आणि इंग्लंड महिला संघात पार पडलेल्या 24 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्मा हिने इंग्लंडच्या चार्ली डीनला मंकडिंग पद्धतीनं बाद केलं होतं. या रनआऊटवर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसननं आपली प्रतिक्रिया देत दीप्तीवर टीका केली आहे. तसंच 'असे काही करण्याचा विचारही करणार नाही' असंही तो म्हणाला आहे.
भारत-विरुद्ध इंग्लंड महिला संघात 24 सप्टेंबर रोजी लॉर्ड्स येथे पार पडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला (Charlie Dean) मंकडिंग पद्धतीनं धावबाद केलं. ज्यानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात या रनआऊटची चर्चा होती. विविध दिग्गज आणि नेटकरी आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी दिप्ती शर्माची ही कृती नियमात बसणारी होती असं म्हटलं आहे तर काहींनी खेळ भावनेचा मुद्दा उपस्थित करत दिप्तीवर टीकाही केली आहे. यात आता इंग्लंड क्रिकेटर जेम्स अँडरसन याने बीबीसीच्या टेलएंडर्सच्या पोडकास्टमध्ये दीप्ती शर्मावर टीका केली आहे. तो म्हणाला''मला वाटचं फलंदाजांनी क्रिजवर असताना अशाप्रकारे बाहेर पडू नये, जेणेकरुन अशाप्रकारे धावचीत होण्याची वेळ येईल. पण दीप्ती आधीपासून तो बॉल न टाकता तिला अशाप्रकारे धावचीत करण्याच्या विचारातच होती. कोणत्याही फलंदाजांना बाद करण्याची ही एक भित्री पद्धत आहे, आम्ही जिथे क्रिकेट खेळलोय, शिकलोय तिथे असं करण्याचा विचारही करणार नाही.''
पाहा कसा होता रनआऊट-
take a bow, Deepti Sharma 🙏 pic.twitter.com/HAocX8cGf7
— Bleh (@rishabh2209420) September 24, 2022
नेमकं काय घडलं?
भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारतानं दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची छमछाक झाली. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिनं 80 चेंडूंमध्ये 47 धावांचं योगदान दिलं. मात्र, 43व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू टाकरण्यापूर्वी नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडलं. त्यावेळी दिप्ती शर्मानं क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून शार्लोट डीनला धावबाद केलं.शार्लोट डीनच्या रुपात भारतानं इंग्लंडच्या संघाला 10 धक्का देत सामना जिंकला. मात्र, दिप्तीनं धावबाद करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे मंकडिंग असून हे खेळभावनेविरोधी कृती असल्याचं मत काहींनी व्यक्त केलंय. तर, काहींनी दिप्तीला थेट पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा-