Eng vs Ind 5th Test : शेवटची कसोटी जिंकण्यासाठी शुभमन गिलचा धाडसी निर्णय; बुमराह बाहेर, करुण नायरची एन्ट्री! टीम इंडियात 4 मोठे बदल
England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना केनिंग्टन येथील ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे.

England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना केनिंग्टन येथील ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. जेणेकरून मालिका बरोबरीत आणता येईल.
कर्णधार शुभमन गिलने नाणेफेकीच्या वेळी म्हटले आहे की, नाणेफेकीच्या वेळी आम्हाला हरण्याची पर्वा नाही. गोलंदाजांसाठी ही चांगली खेळपट्टी असावी. आम्ही बदल केले आहेत. ध्रुव जुरेल, करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाल्यानंतर ध्रुव जुरेलला संधी मिळाली आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी करुण नायरचा समावेश करण्यात आला आहे, जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आला आहे. अंशुल कंबोजला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी आकाश दीपचा समावेश करण्यात आला आहे.
🚨 Toss and Team Update 🚨
— BCCI (@BCCI) July 31, 2025
England win the toss in the 5th Test and elect to field.
A look at #TeamIndia's Playing XI for the 5th and Final Test 👌👌
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/fxzEfXEzLA
भारताला मालिका बरोबरीत आणण्याची संधी
इंग्लंड संघाने पहिला सामना 5 विकेट्सने जिंकला. त्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केले आणि 336 धावांनी सामना जिंकला. त्यानंतर तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जिंकताना हरला आणि 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर, चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. सध्या टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. आता जर भारतीय संघ पाचवा कसोटी सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत येईल.
भारताने ओव्हल मैदानावर जिंकले आहेत फक्त दोन कसोटी सामने
भारतीय संघाने आतापर्यंत केनिंग्टन ओव्हल मैदानावर एकूण 15 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी फक्त दोन जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. तर 7 सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाने आतापर्यंत ओव्हल मैदानावर फक्त विराट कोहली आणि अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला आहे.
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.
भारत : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.





















