एक्स्प्लोर
IND vs ENG 3rd T20 : सूर्यकुमारची एकहाती झुंज व्यर्थ, भारताचा 17 धावांनी पराभव, मालिका मात्र खिशात, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs ENG Live : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना इंग्लंडने 18 धावांनी जिंकला आहे. पण सामन्यात सूर्यकुमार यादवच्या खेळीने सर्वांचच लक्ष्य वेधलं.
IND vs ENG,3rd T20 : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 17 धावांनी पराभव झाला. मालिकेतील आधीचे दोन सामने जिंकलेल्या भारताला हा सामना गमवावा लागल्याने मालिकेत इंग्लंडला व्हाईट वॉश देता आला नाही. पण तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामने जिंकल्याने मालिका भारताने 2-1 खिशात घातली आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतासमोर त्यांनी 216 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. जे भारत पूर्ण करु शकला नाही. दरम्यान भारताकडून सूर्यकुमारने झळकावलेले शतक अप्रतिम होते, पण सामना तो जिंकवून देऊ शकला नाही. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs ENG 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकत इंग्लंडने सामना जिंकला. सामन्यात भारतीय गोलंदाजाकडून खराब गोलंदाजीचं दर्शन घडलं. तर फलंदाजीतही सूर्यकुमार सोडता बाकी सर्व फेल ठरले.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताकडून 117 धावांची एकहाती झुंज देणाऱ्या सूर्याने सर्वांची मनं जिंकली. इंग्लंडने दिलेलं 216 धावांच लक्ष्य पूर्ण करताना भारत 20 षटकात 198 धावाच करु शकला.
- नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली.
- पण नंतर डाविड मलानने तुफान फटकेबाजी करत दमदार असं अर्धशतक लगावलं. त्याच्या कमाल खेळीमुळे इंग्लंडची धावसंख्या काही ओव्हर्समध्येच वाढली.
- मलानने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 77 धावा केल्या. बिश्नोईने त्याची विकेट घेतली, पण त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने तुफान फलंदाजी केली. त्याने 29 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 42 धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडने 20 षटकात इंग्लंडने 215 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
- भारताकडून बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन तर आवेश आणि उमरानने प्रत्येकी एक विकेट घेतली.
- 216 धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारताची सुरुवात खास झाली नाही. रोहित, विराट प्रत्येकी 11 तर पंत एक धाव करुन बाद झाला. ज्यानंतर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला.
- पण 28 धावा करुन अय्यर बाद झाल्यानंतर मात्र सूर्याला कोणाचीच साथ मिळाली नाही. पुढील एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठता आली नाही. अशामध्ये सूर्या एकाबाजूने झुंज देत होता. पण अखेर 25 धावा हव्या असताना सूर्यकुमार मोईन अलीच्या चेंडूवर सॉल्टकर्वी झेलबाद झाला.
- सूर्याने 55 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांस 117 रन केले. पण तो भारताला विजय मिळवू देऊ शकला नाही.
- इंग्लंडकडून आर. टोप्लेने 3, ख्रिस आणि डेविड विलीने प्रत्येकी 2 रिचर्ड आणि मोईन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement