Ind vs Eng 2nd T20I : सूर्याने नाणेफेक जिंकली, टीम इंडियाच्या ढाण्या वाघाला पुन्हा मिळाली नाही संधी; प्लेइंग-11मध्ये 2 मोठे बदल
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.
India vs England, 2nd T20I : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंजियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संधी मिळाली नाही. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्या जागी ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच वेळी, इंग्लंड संघातही दोन बदल झाले आहेत.
🚨 Toss 🚨#TeamIndia win the toss and elect to field 🙌
— BCCI (@BCCI) January 25, 2025
Updates ▶️ https://t.co/6RwYIFWg7i#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WlWb5fiIoK
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग दुखापतीमुळे दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, अष्टपैलू नितीश रेड्डी मालिकेतून पूर्णपणे बाहेर गेला आहे. तो मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही. भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या टी-20 मध्ये भारताने इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव केला होते, ज्यामध्ये रिंकू आणि नितीश भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग होते. मात्र, दोघेही फलंदाजीला आले नाहीत. भारतीय संघात रिंकूची जागा फलंदाज रमणदीप सिंगने घेतली आहे आणि नितीशची जागा अष्टपैलू शिवम दुबेने घेतली आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी शनिवारी बीसीसीआयने ही माहिती दिली. रमनदीपने दोन आणि शिवमने 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Our Playing XI for #INDvENG
— BCCI (@BCCI) January 25, 2025
2️⃣ Changes in the side 👍
Updates ▶️ https://t.co/6RwYIFWg7i#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9Hnhhd2JIH
दोन्ही संघांची प्लेइंग-11
भारत : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंड : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.
हे ही वाचा -