एक्स्प्लोर

IND vs BAN 3rd ODI: तडफदार फलंदाजीनंतर भेदक गोलंदाजी; भारताचा बांगलादेशवर 227 धावांनी विजय

IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला.

IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनच्या (Ishan Kishan) वादळी द्विशतक आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) शतकानंतर शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं तिसरा आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं बांगलादेशसमोर 410 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत बांगलादेशच्या संघाला अवघ्या 182 धावांवर रोखलं. 

ट्वीट-

भारताची भेदक गोलंदाजी
दरम्यान, 410 धावांच्या लक्ष्य रोखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. 50 धावांच्या आत बांगलादेशच्या दोन फलंदाजांना माघारी धाडून भारतानं सामन्यावर मजबूत पकड बनवली. बांगलादेशकडून ऑलराऊंडर शाकीब अल हसननं सर्वाधिक 45 धावांची खेळी केली. कुलदीप यादवनेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. शाकीब व्यतिरिक्त बांगलादेशच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ क्रिजवर टिकता आलं नाही. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतासाठी विलन ठरलेला मेहंदी हसनला उमरान मलिकनं स्वस्तात माघारी धाडलं. बांगलादेशचा संघ 34 व्या षटकात 182 धावांवर ढेपाळला. भारताकडून शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, अक्षर पटेल आणि उमरान मलिकनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळवल्या. याशिवाय, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टनच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट जमा झाली.

ईशान किशन- विराटकडून बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. भारताला 4.1 षटकात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का लागला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी रचत भारताची धावसंख्या 300 पार पोहचवण्यात मदत केली.  भारताच्या डावातील 36 षटकातील अखेरच्या चेंडूवर ईशान किशन आऊट झाला. एका बाजूनं पाठोपाठ विकेट पडत असताना विराट कोहलीनं संघाची दुसरी बाजू संभाळून ठेवली. या सामन्यात श्रेयस अय्यर (3 धावा) आणि कर्णधार केएल राहुल (8 धाव करून बाद झाला.  त्यानंतर 41व्या षटकात विराट कोहलीदेखील शाकीब अल हसनच्या गोलंदाजीचा शिकार झाला. भारतानं निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावून बांगलादेशसमोर 410 धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, हुसेन आणि शाकीब अल हसननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, मुस्ताफिजुर रहमान आणि मेहंदी हसनच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget