(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, Toss Update : ऑस्ट्रेलियानं जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, भारत बॅटिंगसाठी सज्ज
India vs Australia, ODI : आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी एकदिवसीय लढत रंगत असून नुकतीच नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं गोलंदाजी निवडली ऊदद
IND vs AUS, ODI Match Toss : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात आज (19 मार्च) दुसरा एकदिवसीय सामना सुरु होत आहे पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात (Wankhede Stadium) झाला. ज्यात भारताने 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. आता दुसरा सामना जिंकून भारताकडे मालिकाविजयाची संधी असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक (Toss) जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
भारतीय संघाचा विचार केल्यास रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदावर परतला असून त्यामुळे ईशान किशनला विश्रांती दिली गेली आहे. तसचं अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूरच्या जागी अक्षर पटेल संघात आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्येही दोन बदल असून इन्गिसच्या जागी अॅलेक्स कॅरी परतला असून नॅथन एलिस मॅक्सवेलच्या जागी खेळत आहे.
कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
कुठे पाहाल लाईव्ह स्ट्रिमिंग?
भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांपैकी दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर खेळवला जाईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तसेच, या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाईल. या सामन्यांचं थेट प्रक्षेपण डिस्ने प्लस हॉटस्टारवर होईल.
कसोटी मालिका जिंकून आता लक्ष्य एकदिवसीय मालिका
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने (Team India) मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली. चौथा सामना अनिर्णित ठरला असला तरी मालिका भारतानेच जिंकली. आता एकदिवसीय मालिकेतही पहिला सामना भारताने जिंकल्यामुळे आज मालिकाविजयाची संधी भारताकडे आहे.
हे देखील वाचा-