एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
WTC Final : श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून पराभव, भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्री
NZ vs SL : क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात श्रीलंका संघाचा दोन विकेट्सनी पराभव झाल्यामुळे भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला आहे. त्यामुळे आता भारत आणि ऑस्ट्रेलिया जून महिन्यात ही फायनल खेळतील.
World Test Championship Final : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील (SL vs NZ) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने केवळ 2 विकेट्सने जिंकला. ज्याचा थेट फायदा भारतीय संघाला झाला असून भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. WTC फायनलच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पराभूत झाल्यामुळे आता तो भारताच्या पुढे पोहोचू शकत नाही, त्यामुळे भारत थेट फायनलसाठी पात्र ठरला आहे. श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील क्राईस्टचर्च कसोटीत श्रीलंकेने आधी 355 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 373 धावा केल्या. मग श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपल्यावर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 8 गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना जिंकला आहे.
एकीकडे भारतीय संघ जो सध्या अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळत आहे. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. पण आता श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला आहे.
श्रीलंकेची झुंज व्यर्थ
सामन्यात आधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी करुणारत्नेच्या 50. कुसल मेंडिसच्या 87 आणि मॅथ्यूस धनंजया यांच्या 47, 46 या धावसंख्येमुळे श्रीलंकेने पहिल्या डावात 355 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलच्या 102 आणि लॅथमच्या 67 धावांसह मॅट हेन्रीत्या 72 धावांमुळे न्यूझीलंडनं 373 धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाच्या दुसऱ्या डावात अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने 115 धावांची शानदार खेळी करत अडचणीतून बाहेर पडण्याचे काम तर केलेच शिवाय अधिक चांगले लक्ष्य देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय दिनेश चंडिमलने 42 तर धनंजया डी सिल्वाने 47 धावांची शानदार खेळी केली. दुसरीकडे न्यूझीलंडकडून (New Zealand vs Sri Lanka) श्रीलंका संघाच्या दुसऱ्या डावात ब्लेअर टिकनर आणि मॅच हेन्री यांनी गोलंदाजीत अनुक्रमे 4 आणि 3 बळी घेतले. त्याचबरोबर कर्ण धार टीम साऊदीनेही 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्या आधी सामन्यात, पहिल्या डावात 373 धावा करुन न्यूझीलंडने श्रीलंकन संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येवरुन थोडीशी आघाडी घेतली होती. दरम्यान आता दिवसाचा खेळ संपताना न्यूझीलंडची स्थिती 28 वर 1 बाद अशी होती. मग त्यानंतर केन विल्यमसनच्या नाबाद 121 आणि डॅरिल मिचेलच्या 81 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 8 गडी गमावत 286 धावा केल्या आणि सामना दोन विकेट्सनी जिंकला
आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
संघ | विजय | पराभव | अनिर्णीत | एकूण गुण | विजयी टक्केवारी |
1. ऑस्ट्रेलिया | 11 | 3 | 4 | 148 | 68.52 |
2. भारत | 10 | 5 | 2 | 123 | 60.29 |
3. दक्षिण आफ्रीका | 8 | 6 | 1 | 100 | 55.56 |
4. श्रीलंका | 5 | 5 | 1 | 64 | 48.48 |
5. इंग्लंड | 10 | 8 | 4 | 124 | 46.97 |
6. पाकिस्तान | 4 | 6 | 4 | 64 | 38.10 |
7. वेस्ट इंडीज | 4 | 7 | 2 | 54 | 34.62 |
8. न्यूझीलंड | 3 | 6 | 3 | 48 | 33.33 |
9. बांगलादेश | 1 | 1 | 10 | 16 | 11.11 |
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
शिक्षण
Advertisement