(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात टी-20 मालिकेला आजपासून (20 सप्टेंबर 2022) सुरुवात होत आहे.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात टी-20 मालिकेला आजपासून (20 सप्टेंबर 2020) सुरुवात होत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झालाय. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. यादरम्यान रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 विश्वचषकासाठी अचूक प्लेइंग इलेव्हन निवडण्यात मदत होईल. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेच्या वेळापत्रकावर एक नजर टाकुयात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी-20 सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना नागपूर आणि हैदराबाद येथे होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेला तिरुवनंतपुरममध्ये सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसरा टी-20 सामना गुवाहाटी येथे खेळवला जाईल. त्यानंतर शेवटचा टी-20 सामना इंदूर येथे होईल. टी-20 मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. पहिला एकदिवसीय सामना रांची आणि दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना दिल्लीत खेळवला जाईल.
भारत- ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 20 सप्टेंबर 2022 | मोहाली |
दुसरा टी-20 सामना | 23 सप्टेंबर 2022 | नागपूर |
तिसरा टी-20 सामना | 25 सप्टेंबर 2022 | हैदराबाद |
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संघ:
आरोन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स (उपकर्णधार), अॅश्टन अगर, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, डॅनियल सेम्स, शॉन अॅबॉट.
हे देखील वाचा-