एक्स्प्लोर

Legends League: मणिपाल टायगर्सचा दुसऱ्या सामन्यातही पराभव, गुजरात जायंट्स दोन विकेट्सनं जिंकलं 

Gujarat Giants vs Manipal Tigers : मणिपाल टायगर्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे. गुजरात जायंट्सने मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. 

Gujarat Giants vs Manipal Tigers : मणिपाल टायगर्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे.  लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. 

लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट 2022 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं  मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. गुजरात जायंट्सनं आठ विकेट्सच्या मोबदल्यात 121 धावांचा यशस्वी पाठलाग करत दोन विकेट्सनं सामना जिंकला.  गुजरात जायंट्सकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंह, मुरलीधरण, परविंदर अवाना आणि मपोफू यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. 

मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव - 
121 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार विरेंद्र सेहवाग स्वस्तात माघारी परतला. मपोकूनं विरेंद्र सेहवागला अवघ्या एका धावेवर बाद केले. गुजरातला दुसरा धक्काही मपोकूनेच दिला. मपोकूने विस्फोटक दिलशानला शून्य धावसंख्येवर क्लीन बोल्ड केले.  दोन विकेट झटपट गेल्यानंतर गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. पण पार्थिव पटेल आणि केविन ओ ब्रायन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी मोठी भागिदारी केली. पार्थिव पटेल 34 धावा करुन परविंदर अवानाच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी करणारा केविन ओ ब्रायनही बाद झाला. परविंदर अवानाने केविन ओ ब्रायनला बाद केले. केविन ओ ब्रायन 23 धावा काढून बाद झाला. पार्थिव आणि ओ ब्रायन बाद झाल्यानंतर लेंडल सिमंस आणि थिसारा परेरा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सनं मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. 

मणिपाल टायगर्सची  121 धावांपर्यंत मजल -

दरम्यान, त्यापूर्वी मणिपाल टायगर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधाराचा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. 15 धावसंख्येवर मणिपाल टायगर्स संघाला धक्का बसला. शिवकांत शुक्ला (11) स्वस्तात तंबूत परतला. तीस धावांच्या आत मणिपाल संघाला तीन धक्के बसले. स्वपनिल (5) आणि तातेंदा तायबू (1) स्वस्तात तंबूत परतला. लागोपाठ विकेट पडल्यानंतर मोहम्मद कैफ आणि रविकांत शुक्लानं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद कैफनं 24 धावांची खेळी केली.  तर रविकांत शुक्लानं सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंह याने अखेरच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. हरभजन सिंह याने 18 धावांची खेळी केली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Hardik Pandya Mumbai Indians: 14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही सांगितली!
14 पैकी 10 सामन्यात पराभव, शेवटचा सामनाही MI ने गमावला; हार्दिक पांड्या बोल बोल बोलला, एक चूकही सांगितली!
IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने...पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
4 संघ, 4 सामने...पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
DC vs KKR IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
दिल्ली कॅपिटल्सच्या विजयानं लीग स्टेजचा समारोप, अखेरच्या सामन्यात अजिंक्य रहाणे धुरंदर ढेपाळले, केकेआरची सलामी अन् शेवट देखील पराभवानं
KKR vs DC Live Score Updates : दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली
दिल्लीच्या 'कॅपिटल्स' पुढे कोलकाता 'नाईट' ढेर; 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची गाडी 163 वरच रोखली

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
2 लाख ठरले, पण 45 हजारांची लाच घेताना अटक; ग्रामपंचायतमधील महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
RCB vs GT Qualifier 1: पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, जाणून घ्या IPL चा नियम 
पावसामुळं क्वालिफायर-1 रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण? बंगळुरु की गुजरात, राखीव दिवस आहे का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
NEET पेपरफुटी, लातूर पॅटर्न, मोटेगावकर; अमित देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी टिपण्णी करावी असे...
Embed widget