IND vs AUS Super Over: सुपरओव्हर सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; स्मृती मानधनाची जबरदस्त कामगिरी
IND vs AUS Super Over: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियममध्ये (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दुसरा टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.
IND vs AUS Super Over: मुंबईच्या (Mumbai) डीवाय पाटील स्टेडियममध्ये (Dr DY Patil Sports Academy) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 187 धावापर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सुपरओव्हर सामन्यात स्मृती मानधना (Smriti Mandhana), रिचा घोष (Richa Ghosh) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 21 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरनं (Renuka Thakur Singh) भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. ज्यामुळं सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय.
ट्वीट-
WHAT. A. MATCH 💥#TeamIndia beat Australia in the Super Over 🙌
— BCCI Women (@BCCIWomen) December 11, 2022
Series now tied at 1-1 👍 #INDvAUS
Scorecard 👉 https://t.co/2OlSECwnGk… pic.twitter.com/P6kyZYjgQc
भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपरओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये भारतानं एक विकेट गमावून 20 धावा केल्या. यादरम्यान स्मृतीनं एक चौकार आणि एक षटकार ठोकला. रिचानंही एक षटकार मारला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ एक विकेट गमावून 16 धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या डावात भारतानं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची जबाबदारी रेणुका सिंहकडं सोपवली. तिनं 16 धावांत एक विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.
मोक्याच्या क्षणी रिचा घोषची फटकेबाजी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मानं शानदार खेळी केली. पण शेफाली 23 चेंडूत 34 धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरनं 21 धावांचं योगदान दिलं. अखेरच्या दोन षटकात ऋचा घोष आणि देविका वैद्य यांनी जोरदार फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 187 धावापर्यंत पोहचवली. ज्यामुळं हा सामना बरोबरीत सुटला.
ऑस्ट्रेलियाची दमदार फलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाची कर्णधार अॅलिसा हिली आणि बेथ मुनी सलामी देण्यासाठी मैदानात आल्या. अॅलिसा 25 धावा करून बाद झाली. दीप्ती शर्मानं तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. मात्र, त्यानंतर ताहिल आणि बेथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागिदारी झाली. ताहिलनं 51 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. या खेळीत तिनं 10 चौकार आणि एक षटकार मारला. तर, बेथनं 54 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. ज्यात 13 चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं 20 षटकांत एक विकेट गमावून 187 धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मानं 4 षटकात 41 धावा देत एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-