BAN vs IND Test Series: रोहित शर्मा पहिल्या सामन्याला मुकणार, शामी- जाडेजा मालिकेतून बाहेर, उनाडकटचा संघात समावेश
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आलाय.
BAN vs IND Test Series: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात येत्या 14 डिसेंबरपासून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळं पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलाय. या सामन्यात केएल राहुलकडं (KL Rahul) नेतृत्व सोपवण्यात आलंय. याशिवाय, मोहम्मद शामी (Mohammed Shami), रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) मालिकेतून बाहेर पडलाय. त्यांच्याऐवजी नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि सौरभ कुमारला (Saurabh Kumar) संघात स्थान देण्यात आलंय. बीसीसीआयच्या (BCCI) निवड समितीनं वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही (Jaydev Unadkat) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केलाय.
ट्वीट-
The selection committee has also added fast bowler Jaydev Unadkat to India’s squad for the Test series.
— BCCI (@BCCI) December 11, 2022
More details here - https://t.co/LDfGOYmMkz #BANvIND https://t.co/beOdgO2SYX
भारत-बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी सामन्यांचा थरार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.
भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14-18 डिसेंबर 2022 | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22-16 डिसेंबर 2022 | शेर-ए-बांगला स्टेडियम |
भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
हे देखील वाचा-