एक्स्प्लोर

Ind vs Aus 5th Test : ऋषभ पंत OUT, ध्रुव जुरेल IN; सिडनी कसोटी जिंकण्यासाठी गौतमची 'गंभीर' खेळी, टीम इंडियात 1, 2 नाही होणार इतके बदल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.

IND vs AUS 5th Test Playing XI Prediction : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा (BGT 204-25) पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. ज्यामध्ये कांगारू संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शचा बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर 31 वर्षीय वेगवान गोलंदाज अष्टपैलू ब्यू वेबस्टरला (Beau Webster) त्याची जागी संघात घेण्यात आले आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कांगारू संघाच्या घोषणेनंतर भारत कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह सिडनीमध्ये मैदानात उतरू शकतो हे जाणून घेऊया...

पाचव्या कसोटीतून ऋषभ पंत बाहेर?

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी धोक्यात आल्याने भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतात. ज्यामध्ये ऋषभ पंतवर (Rishabh Pant) टांगती तलवार आहे. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंतला यावेळी काही खास कामगिरी करता आली नाही. चार कसोटी सामन्यांमध्ये फक्त पर्थमध्ये केलेल्या 37 धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. अशा परिस्थितीत आता संघ व्यवस्थापन ध्रुव जुरेलचा विचार करत आहे, ज्याने दौऱ्याची शानदार सुरुवात केली होती. 23 वर्षीय यष्टीरक्षकाने ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघाकडून 80 आणि 68 धावा केल्या होत्या. पण तेव्हापासून तो बेंचवर बसून आहे, आता पंत संघर्ष करत असताना जुरेलचा विचार केला जात आहे.

हर्षित राणाला मिळणार संधी 

दरम्यान, आकाशच्या दुखापतीमुळे भारताला त्यांच्या गोलंदाजी कॉम्बिनेशनमध्ये फेरविचार करावा लागू शकतो. जसप्रीत बुमराहचा वर्कलोड हा आधीच चिंतेचा विषय आहे, त्यामुळे भारताला इतर पर्यायांचाही विचार करावा लागेल. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आकाशच्या जागी राणाला संधी मिळू शकते.

रोहित शर्मा सिडनीत खेळणार?

रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. पत्रकार परिषदेत गौतम गंभीरला रोहितच्या सिडनीतील खेळाबद्दल विचारण्यात आले. यावर मुख्य प्रशिक्षक म्हणाला, उद्याची खेळपट्टी पाहून आम्ही नाणेफेकीच्या वेळी प्लेइंग इलेव्हन निवडू. रोहित शर्माने सध्याच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 कसोटी सामन्यांच्या 5 डावात केवळ 31 धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याची फलंदाजीची सरासरी केवळ 6.20 आहे, जी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या जगातील कोणत्याही कसोटी कर्णधारांमध्ये सर्वात कमी आहे. अशा स्थितीत त्याला वगळल्याची चर्चा आहे. असे झाल्यास मेलबर्न कसोटीतून वगळलेले शुभमन गिलचे पुनरागमन होऊ शकते. टीम इंडियाच्या गुरुवारी झालेल्या नेट सेशननेही गिलला सिडनीत खेळण्याची संधी मिळू शकते, असे संकेत मिळाले आहेत. तर जसप्रीत बुमराह कर्णधार होऊ शकतो.  

ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन (Australia playing 11) : सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

सिडनी कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद सिराज.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Embed widget