India vs Australia, 3rd Test | दोन्ही संघात होणार मोठे बदल, 'या' स्टार खेळाडूंवर सर्वांची नजर
India vs Australia, 3rd Test : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाईल.
![India vs Australia, 3rd Test | दोन्ही संघात होणार मोठे बदल, 'या' स्टार खेळाडूंवर सर्वांची नजर Ind vs Aus 3rd Test Some big changes can happen in both teams in sydney test India vs Australia, 3rd Test | दोन्ही संघात होणार मोठे बदल, 'या' स्टार खेळाडूंवर सर्वांची नजर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/06141346/Ind-vs-Aus-3rd-Match.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ind vs Aus 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवारी सिडनी येथे सुरू होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियांच्याकील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांने 1-1 सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत कोणताही संघ तिसरी कसोटी जिंकणे पसंत करेल. मेलबर्न क्रिकेट मैदानावरील कामगिरीला कायम ठेवावं लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाला संघ दुसर्या कसोटीतील पराभवाला मागे सारून तिसरी कसोटी कशी जिंकता येईल याकडे पाहावे लागणार आहे. तथापि, तिसर्या कसोटीसाठी संघ निवडणे ही दोन्ही संघांची सर्वात मोठी चिंतेची बाब असणार आहे.
IND VS AUS | सिडनी कसोटीला गुरुवारपासून सुरुवात, रोहित शर्मा सज्ज, शार्दुल आणि सैनीत मोठी चुरस
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने उर्वरित सामन्यातून माघार घेतली असून तो लवकरच भारतात परतणार आहे. सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी ही बातमी भारतीय संघासाठी काहीशी चिंतेची ठरु शकते. तिसर्या कसोटी सामन्यात दोन्ही संघात बरेच बदल पाहायला मिळू शकतात. भारतीय संघात रोहित शर्माची पुनरागमन आणि टी नटराजनचं पदार्पण होऊ शकते. उर्वरित दोन सामन्यांसाठी रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. तिसर्या कसोटीत रोहित शर्मा मयांक अगरवालची जागा घेऊ शकतो आणि शुभमन गिलसह सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो.
KL Rahul Ruled Out | केएल राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उर्वरित दोन कसोटीमधून बाहेर
दरम्यान, तिसर्या कसोटीत युवा गोलंदाज टी नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. नटराजनने एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात गोलंदाजीमुळे सर्वांना प्रभावित केले आहे. तर दुसरीकडे शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी शर्यतीत असून, भारतीय संघव्यवस्थापनापुढे हा पेच कायम आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की सलामीची जोडी दिसू शकते. दुखापतीमुळे या दोन्ही फलंदाजांचा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात समावेश नव्हता.
दरम्यान बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून खेळवला जाईल.
INDvsAUS | सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला कडक पहारा, खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)