एक्स्प्लोर

INDvsAUS | सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला कडक पहारा, खेळाडू हॉटेलबाहेर जाऊ शकणार नाहीत

मेलबर्नमधील रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी या पाच भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दरम्यान खेळाडूंनी बायो बबल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होत होता.

मेलबर्न : भारतीय संघ सोमवारी सिडनीला रवाना झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना 7 जानेवारीपासून खेळला जाणार आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना प्रशिक्षणाशिवाय हॉटेलबाहेर जाण्यास नकार दिला आहे. बीसीसीआयने सोमवारी आयएएनएसला याबाबत पुष्टी केली आहे. खेळाडूंना बायो सिक्युरिटी बबलमध्ये राहणे आणि खेळाडूंनी हॉटेल-ग्राउंड-हॉटेलपुरतेच मर्यादीत राहाण्यास सांगितले आहे.

संघ व्यवस्थापनाच्या सल्ल्याचा अर्थ असा आहे की पुढील दोन आठवड्यांपर्यंत खेळाडू क्वॉरंटाईन राहतील. सिडनीनंतर टीम ब्रिस्बेनमध्येही क्वॉरंटाईन राहणार आहे. सोमवारी, बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) यांनी दोन्ही संघाचे खेळाडू, सपोर्टिंग स्टाफ आणि दोन्ही संघांचे अधिकारी यांची कोविड 19 टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

बीसीसीआयने सोमवारी सकाळी एका निवेदनात म्हटलं की, 3 जानेवारी 2021 रोजी भारतीय संघाचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सामन्याच्या अधिकाऱ्यांची टेस्टही निगेटिव्ह आल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

मेलबर्नमधील रेस्टॉरंटमध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी या पाच भारतीय खेळाडूंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या दरम्यान खेळाडूंनी बायो बबल नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होत होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं बोललं जात आहे.

सिडनी मॉर्निग हेराल्डच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआय यासंदर्भात व्यवहारिक पद्धत अवलंबणार असून पाचही खेळाडूंना बायो बबलचं नियम मोडल्याप्रकरणी दंड आकारण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या खेळाडूंना शिक्षा देऊ शकत नाही, कारण हे खेळाडू त्यांचे नाहीत. त्यामुळे यासंदर्भात निर्णय बीसीसीआय घेणार आहे.

दरम्यान, अशी घटना पहिल्यांदा घडत नसून याआधीही भारतीय खेळाडूंनी बायो बबलच्या प्रोटोकॉल्सचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला सिडनीतील एका दुकानात खरेदी करताना फोटो काढला होता. तसेच अशाही चर्चा आहेत की, भारतीय संघ ब्रिस्वेनमध्ये होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी तिथे जाण्यास तयार नाही. त्याचं कारण म्हणजे, क्वींसलँड सरकारने लागू केलेली लॉकडाऊनची कठोर नियमावली. क्विन्सलँड सरकारने म्हटले आहे की भारतीय संघाने नियमांचे पालन न केल्यास ते खेळू शकणार नाहीत. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहे. मालिकेचा तिसरा सामना सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 2nd T20 Playing 11 : अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
अभिषेकसोबत वैभव सलामीला, तर टी-20 वर्ल्ड कपचा हिरो OUT...; दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची हादरवणारी Playing-11
IND vs ENG 2nd T20I : पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
पहिली मॅच पाण्यात गेली, दुसऱ्या मॅचवरही संकट; मँचेस्टरमधून सर्वात मोठी अपडेट, किती वाजता सुरू होणार मॅच?
IND vs ENG 2nd T20I : टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले
टीम इंडिया मँचेस्टरला पोहोचली, BCCIने वैभव सूर्यवंशीचा 'तो' व्हिडीओ पोस्ट करतातच चाहते भडकले, नको नको ते बोलले
Sri Lanka A vs India A 2nd Test : 2 गोलंदाज अन् 8 विकेट्स! भारतीय अ संघाच्या पोरांनी श्रीलंकेला त्यांच्याच घरात नाचवलं, एकाने तर महिनाभरापूर्वीच पदार्पण केलं
2 गोलंदाज अन् 8 विकेट्स! भारतीय अ संघाच्या पोरांनी श्रीलंकेला त्यांच्याच घरात नाचवलं, एकाने तर महिनाभरापूर्वीच पदार्पण केलं

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
Embed widget