(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, Playing 11 : ऑस्ट्रेलिया दोन महत्त्वाच्या बदलांसह मैदानात, टीम इंडियाची सेम प्लेईंग 11
IND vs AUS : आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाने कोणताच बदल केला नसून सूर्यकुमार दोन्ही सामन्यात शून्यावर बाद होऊनही त्याला संधी दिली गेली आहे.
IND vs AUS 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (22 मार्च) खेळवला जात असून टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरत आहे. दरम्यान भारतीय संघाचा विचार करता भारत आहे त्याच संघासह म्हणजेच दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील संघासह मैदानात उतरत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मात्र दोन बदलांसह टीम मैदानात उतरवली आहे.
ऑस्ट्रेलिया संघातील सर्वात मोठा बदल म्हणल्यास स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर संघात परतला आहे. दोन सामने विश्रांतीवर असलेला वॉर्नर आज मैदानात उतरणार असून त्याचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड दमदार असल्याने भारतीय संघाला त्याचा धोका असेल. त्याच्या जागी कॅमेरॉन ग्रीन फिट नसल्यामुळे विश्रांतीवर आहे. तसंच आजची खेळपट्टी पाहता संघाने अॅश्टन एगरलाही संधी दिली असून नॅथन एलिसला विश्रांती दिली गेली आहे. तर नेमकी दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे पाहूया...
कशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11?
ऑस्ट्रेलिया (प्लेईंग इलेव्हन) : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
भारत (प्लेईंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
View this post on Instagram
पिच रिपोर्ट काय म्हणतोय?
आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट (Chennai Cricket stadium) स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एमए चिदंबरम (MA Chindabaram) असं नाव असणाऱ्या या स्टेडियमची खेळपट्टी (Pitcj Report) जी एकेकाळी वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती, ती आता संथ आणि फिरकीपटूंना मदत करण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन्ही डावातील सरासरी धावसंख्या 250 पेक्षा जास्त झालेली नाही. परंतु, सध्या असणाऱ्या हवामानाच्या अंदाजानुसार, वेगवान गोलंदाजांना खेळाच्या सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते.
हे देखील वाचा-