Women's Premier League: WPL फायनल्समध्ये दिल्लीची धडक; मुंबई विरुद्ध युपी रंगणार एलिमिनेटर सामना
Women's Premier League: दिल्ली कॅपिटल्सनं महिला प्रीमियर लीगच्या (WPL) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. अंतिम सामन्यात दिल्लीचा सामना मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी होईल.
Women's Premier League: दिल्ली कॅपिटल्स (DC) नं महिला प्रीमियर लीग (WPL) च्या फायनल्समध्ये धडक दिली आहे. मंगळवारी (21 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या ग्रुप मॅचेसमध्ये दिल्लीनं यूपी वॉरियर्सचा (UPW) पाच गडी राखून पराभव केला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सनं पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आणि थेट फायनलमध्ये प्रवेश केला.
एलिमिनेटर मॅच मुंबई आणि यूपी यांच्यात
फायनल्समध्ये दिल्ली कॅपिटल्स यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर मॅचमधील विजेत्याशी भिडणार आहे. पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स दुसऱ्या आणि यूपी वॉरियर्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी एलिमिनेटर मॅचसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. एलिमिनेटर मॅच 24 मार्चला तर फायनल्स 26 मार्चला होणार आहे.
एलिमिनेटर मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्ससमोर 139 धावांचं आव्हान होतं. जे त्यांनी 13 चेंडू राखत पूर्ण केलं. कर्णधार मेग लॅनिंगनं सर्वाधिक 39 आणि मारिजाने कॅपनं नाबाद 34 धावांची खेळी केली. तसेच, आपल्या गोलंदाजीनं तीन विकेट्स घेणाऱ्या एलिस कॅप्सीनं फलंदाजी करताना 34 धावांची खेळी केली. एलिप्स कॅप्सी इंग्लंडसाठी आंतराराष्ट्रीय क्रिकेट खेळते.
𝘼𝙣 𝙚𝙣𝙤𝙧𝙢𝙤𝙪𝙨 𝙘𝙡𝙖𝙨𝙝 𝙖𝙬𝙖𝙞𝙩𝙨! 🔥🔥@mipaltan will face @UPWarriorz in the ELIMINATOR of the #TATAWPL 🙌
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 21, 2023
Who will join @DelhiCapitals in the Final 🤔 pic.twitter.com/3cnsHIFPVG
ताहिला मॅक्ग्राची खेळी व्यर्थ
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सनं सहा विकेट गमावत 138 धावा केल्या. ताहिला मॅक्ग्रानं 32 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 58 धावा केल्या. तसेच, कर्णधार अॅलिसा हिलीनं 34 चेंडूत एकूण 36 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून एलिस कॅप्सीने 26 धावांत तीन बळी घेतले. राधा यादवला दोन, तर जेस जोनासेनलाही यश मिळालं.
WPL प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक
24 मार्च : एलिमिनेटर मॅच : मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, 7:30 PM, डीव्हाय पाटील स्टेडियम
26 मार्च : फायनल्स : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध TBC, 7:30 PM ब्रेबॉर्न स्टेडियम
मागील सामन्यातही आरसीबीचा पराभव
मंगळवारी (21 मार्च) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळवण्यात आला. डीव्हाय पाटील स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं नऊ गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघानं 16.3 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबईकडून एमिलिया केरनं सर्वाधिक नाबाद 31 धावांचं योगदान दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
WPL 2023 : दिल्लीचा फायनलमध्ये प्रवेश, युपीला पाच विकेटने हरवले