एक्स्प्लोर

Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 

Rishabh Pant Money Donation : विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टी20 विश्वचषकातून (T20 World Cup 2024)  टीम इंडियात दमदार (Indian Cricket Team) कमबॅक केलेय.

Rishabh Pant Money Donation : विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टी20 विश्वचषकातून (T20 World Cup 2024)  टीम इंडियात दमदार (Indian Cricket Team) कमबॅक केलेय. दीड वर्षाखाली ऋषभ पंत याचा भीषण कार अपघात झाला होता. त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात बचावला होता. त्यानंतर त्यानं प्रचंड मेहनत घेत टीम इंडियातील स्थान मिळावले. टी20 विश्वचषकात शानदार फलंदाजी करत त्यानं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवलाय. आता टी20 विश्वचषकादरम्यान ऋषभ पंत यानं मोठी घोषणा केली आहे. युट्यूबमधून मिळणारी सर्व संपत्ती आणि विश्वचषकादरम्यान मिळणाऱ्या रक्कमेतील काही भाग दान करणार असल्याची घोषणा पंतने केली आहे. ऋषभ पंतच्या या निर्णायाचं सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. 

विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याने 18 मे 2024 रोजी यूट्यूब चॅनल सुरु केले होते. त्यावर आतापर्यंत सात व्हिडिओ अपलोड केले आहेत. पंतने एक लाख यूट्यूब सबस्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे यूट्यूबकडून ऋषभ पंत याला सिल्व्हर प्ले बटण पाठवले आहे. पंतने यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये सिल्व्हर प्ले बटण असलेली एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, तो YouTube मधील सर्व कमाई, त्याच्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह एका चांगल्या कारणासाठी दान करणार आहे. म्हणजे युट्युब चॅनलवरून पंत जे काही कमवणार आहे, ते सर्व दान करणार आहे. त्याशिवाय स्वत:च्या कमाईतील काही भागही तो दान करणार आहे. 

पंतने कम्युनिटी पोस्टमध्ये काय म्हटलेय ? 

ऋषभ पंतने कम्युनिटी पोस्टमध्ये लिहिले की, "हे सिल्व्हर प्ले बटण आपल्या सर्वांचे आहे. आतापर्यंत एक लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहे आणि आणखी लोक सामील होत आहेत. हा माइलस्टोन चिन्हांकित करण्यासाठी, मी माझ्या स्वतःच्या कमाईतील काही योगदानासह  YouTube मधून मिळणारी सर्व कमाई चांगल्या कामासाठी दान करत आहे. या प्लॅटफॉर्मचा उपयोग चांगल्या बदलासाठी आणि सुधारण्यासाठी करूया."

विश्वचषकात ऋषभ पंतचा धमाका, शानदार कामगिरी -

टी20 विश्वचषकात ऋषभ पंत याने शानदार कामगिरी केली आहे. न्यूयॉर्कच्या संथ खेळपट्टीवर त्यानं दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केले. विराट-रोहितला जे जमलं नाही, ते पंतने करुन दाखवलेय. बांगलादेशविरोधात झालेल्या सराव सामन्यात पंतने 53 धावांची शानदार खेळी केली केली. त्यानंतर आयर्लंडविरोधात पहिल्या सामन्यात नाबाद 36 धावांचे योगदान दिले होते. त्यानंतर पाकिस्तानविरोधात 42 धावांचे महत्वाचं योगदान दिले होते. अमेरिकाविरोधात 18 धावांची खेळी केली होती. पाकिस्तानविरोधात पंतने केलेली 42 धावांची खेळी टीम इंडियाच्या विजयासाठी महत्वाची ठरली. दिग्गज फलंदाज तंबूत गेल्यानंतर पंतने एकहाती किल्ला लढवला होता. 

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget