हार्दिक पांड्यासाठी धोक्याची घंटा, टीम इंडियातील कमबॅक झालं कठीण!
वनडे विश्वचषकात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाबाहेर आहे. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे, पण तो मैदानात कधी कमबॅक करणार? याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही.
T20 World Cup 2024 : स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) टीम इंडियातील कमबॅकचा प्रश्न अधिकच कठीण होत चालला आहे. वनडे विश्वचषकात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाबाहेर आहे. हार्दिक पांड्या आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे, पण तो मैदानात कधी कमबॅक करणार? याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यातच शिवब दुबे (Shivam Dubey) ज्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहे, ते पाहता हार्दिक पांड्याचं टीम इंडियातील कमबॅक कठीण होऊन बसलं आहे. त्यातच रोहित शर्मा (ROHIT SHARMA) दीड वर्षानंतर टी 20 संघात परतला आहे.
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने शिवब दुबे याच्यावर डाव खेळला. अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेत शिवम दुबे याने प्रभावी कामगिरी करत निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले. दोन सामन्यात त्याने बॅट आणि चेंडूने कमाल केली. पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात शिवब दुबे याने नाबाद अर्धशतके ठोकली. शिवब दुबेच्या या कामगिरीमुळे बीसीसीआय सेंट्रेल कॉन्ट्रैक्टमध्ये त्याचा समावेश कऱणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जर असे घडले आणि शिवम दुबेचा आयपीएलमध्येही फॉर्म कायम राहिला तर त्याची टी-20 विश्वचषक खेळण्याची शक्यता आणखी वाढतेय. त्यामुळे हार्दिक पांड्याला टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
रोहित शर्माचं कमबॅक -
हार्दिक पांड्याची दुखापत लक्षात घेऊन बीसीसीआयने आपला बॅकअप प्लॅन तयार केला आहे. रोहित शर्माचे तब्बल 14 महिन्यांनंतर टी-20 संघात पुनरागमन झाले आहे. पहिल्या दोन सामन्यात रोहितला फलंदाजीत लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण रोहितकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आयपीएलचा संपूर्ण हंगाम आहे. रोहितला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली तर त्याला संघाचे कर्णधारपद मिळणार हे निश्चित मानले जातेय. अशा स्थितीत टी 20 विश्वचषकात हार्दिक पांड्याला संधी मिळणार का? असाही सवाल उपस्थित होतोय.
हार्दिक पांड्या कमबॅक कधी करणार ?
हार्दिक पांड्या सध्या फिटनेवर काम करतोय. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियात समोर आले आहे. पण तो मैदानावर कधी परतणार? याबाबत कोणतीही अपडेट नाही. हार्दिक पांड्या आयपीएलदरम्यान मैदानात परतणार असल्याचे वृत्त समोर आलेय. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला डावलत हार्दिक पांड्याला कर्णधार केलेय.जर हार्दिक पांड्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळला नाही तर मुंबईच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? असा सवालही उपस्थित राहिला आहे.