(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Yuvraj Singh on Ben Stokes Retirement: 'काही हरकत नाही...' बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर युवराज सिंह भावूक!
Yuvraj Singh on Ben Stokes Retirement: इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन स्टोक्सनं (Ben Stokes) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलाय.
Yuvraj Singh on Ben Stokes Retirement: इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन स्टोक्सनं (Ben Stokes) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल खेळण्यात खेळण्यात आलेला एकदिवसीय सामना त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. बेन स्टोक्सच्या निवृत्तीच्या घोषणानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहनं (Yuvraj Singh) बेन स्टोक्सला त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीचं कौतूक केलं. यावेळी युवराज सिंह भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बेन स्टोक्सचा अखेरचा एकदिवसीय सामना ठरला
स्टोक्सनं सोमवारी (18 जुलै 2022) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. तसेच मंगळवारी 19 जुलै 2022 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळणार असल्याची माहिती दिली. स्टोक्सनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृती घेतली असली तरी तो इंग्लंडसाठी कसोटी आणि टी-20 क्रिकेट खेळणार आहे. यानंतर युवराज सिंहनं ट्वीटरच्या माध्यमातून बेन स्टोक्सनं खूप लवकर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केल्यानं खंत व्यक्त केली.
युवराज सिंहचं ट्वीट-
युवराज सिंह काय म्हणाला?
"बेन स्टोक्सला एकदिवसीय कारकिर्दीसाठी शाबासकी. कोणत्याही संघासाठी अमूल्य असलेल्या या जागतिक दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूनं लवकर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तू आणखी काही काळ एकदिवसीय क्रिकेट खेळू शकला असता. काय हरकत नाही, तुला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा!"
बेन स्टोक्सची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्द
बेन स्टोक्सला त्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्यानं 5 षटकात 44 धावा खर्च केल्या आणि 11 धावा करून आऊट झाला. स्टोक्सनं एकदिवसीय आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 105 सामने खेळले आहेत. ज्यात 38 सरासरीनं 2 हजार 924 धावा केल्या आहेत आणि 74 विकेट्स घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-
- England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर
- Ben Stokes Retirement : बेन स्टोक्सच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीला ICC जबाबदार, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा