![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर
Washington Sundar : वॉशिंगटन सुंदर हा इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे तो मागील काही काळ मैदानात उतरलेला नाही.
![England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर Washington Sundar is so exited fo playing with james anderson in Lancashire Cricket Club at county cricket England Cricket : 'जेम्स अँडरसनसोबत एकाच संघात खेळण्यासाठी कमालीचा उत्साही' : वॉशिंग्टन सुंदर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/783af53e4ff3b7258c5acf2eb7ddb0f5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lancashire Cricket Club, Washington Sundar : भारतीय ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) काऊंटी क्रिकेटमधील लंकाशर (Lancashire) संघासोबत खेळण्यासाठी कमालीचा उत्सुक आहे. यावेळी तो दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याच्यासोबत खेळण्यासाठी अधिक उत्साहीत असल्याचं त्याने म्हटलं आहे. 'मी प्लेस्टेशनवर व्हिडीओ गेम खेळतानाही हा संघ निवडायचो' असंही तो म्हणाला आहे.
मागील वर्षी जुलैमध्ये बोटाला दुखापत झाल्यानंतर थेट आता 22 वर्षीय वॉशिंग्टन इंग्लंड काऊंटी क्रिकेटमधील लंकाशर संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळेच मागील वर्षी भारत इंग्लंड दौऱ्यातून बाहेर गेला होता. इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या दुसऱ्या भागातही तो खेळू शकला नव्हता. ज्यानंतर आता पुन्हा मैदानात परतत असताना यापूर्वी एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना सुंदर म्हणाला, ‘‘मला आठवतं जेव्हा मी माझ्या प्लेस्टेशन वर व्हिडीओ गेममध्ये क्रिकेट खेळायचो तेव्हा स्थानिक संघ म्हणून लंकाशर संघच निवडायचो आता त्याच संघात खेळण्यासाठी मी उत्साही आहे. तसंच दिग्गज खेळाडू अँडरसनसोबत ड्रेसिंग रुम शेअर कऱण्यासाठीही मी उत्सुक आहे.’’
सध्या चार भारतीय खेळाडू काऊंटी क्रिकेटमध्ये
सद्यस्थितीला भारताचे चार खेळाडू इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. यावेळी आता नवदीप सैनीच्या स्पर्धेत जाण्याने पाच भारतीय यंदाचा काऊंटी क्रिकेट सीजन खेळत आहेत. याआधी चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंगटन सुंदर (लंकाशायर), क्रुणाल पांड्या (वार्विकशायर) आणि उमेश यादव (मिडलसेक्स) संघाकडून खेळत आहेत. सैनी गेलेल्या केंट संघाला यंदा खास कामगिरी करता आलेली नाही. त्यानी खेळलेल्या 9 सामन्यातील केवळ एकच सामना त्यांनी जिंकला आहे. गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा-
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
- Zlatan Ibrahimovic: एज डजन्ट मॅटर! वयाच्या 41व्या वर्षानंतरही स्टार खेळाडू ज्लाटान इब्राहिमोविचस खेळणार फुटबॉल
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)