(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
Sreesanth Team India : एकेकाळी भारतीय संघातील एक महत्त्वपूर्ण गोलंदाज असणाऱ्या श्रीशांतवर मॅच फिक्सिंगचा आरोप लागल्यामुळे त्याची क्रिकेट कारकिर्द संपुष्टात आली.
Sreesanth Virat Kohli Team India World Cup : क्रिकेट जगतातील आघाडीचा संघ असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर एकही आयसीसी टूर्नामेंट जिंकता आली नाही. त्याआधी 2011 साली एकदिवसीय आणि 2007 साली टी20 विश्वचषक भारताने जिंकला होता. दरम्यान धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली कर्णधार झाला, ज्याच्या नेतृत्त्वाखाली संघाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. याबद्दल बोलताना माजी गोलंदाज श्रीशांत म्हणाला आहे की,'मी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळलो असतो तर संघाने विश्वचषक नक्कीच जिकला असता.'
विराट कोहली भारतीय संघातील एक आघाडी फलंदाज असून जगभरात त्याचा डंका आहे. त्याने संघाला बरेच महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिले. कसोटी रँकिंगमध्येतर सर्वोत्कृष्ट स्थानी भारताला विराटनेच आणून ठेवलं. पण असं असतानाही विराट भारताला एकही आयसीसी ट्रॉफी मात्र जिंकवून देऊ शकला नाही. 2017 मध्ये चॅम्पिंयन्स ट्रॉफीमध्ये त्यानंतर 2019 साली एकदिवसीय विश्वचषक आणि 2021 साली WTC फायनलमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आता माजी गोलंदाज श्रीशांतने म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली तो संघात खेळला असता तर भारत विश्वचषक नक्कीच जिंकला असता. अशाचप्रकारे 2011 साली सचिन तेंडुलकरसाठी आम्ही विश्चचषक जिंकला होता.
कशी होती श्रीशांतची कारकिर्द?
श्रीशांतच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने 27 कसोटी सामन्यात 87 विकेट्स, 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट्स आणि 10 टी20 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्येही त्याने काही सामने गाजवले असून 44 आयपीएलच्या सामन्यात त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये श्रीशांतने 281 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात 44, टी20 सामन्यात 20 आणि आयपीएलमध्ये 34 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- KL Rahul Vs Jhulan Goswami: नेटमध्ये झुलन गोस्वामीची केएल राहुलसमोर घातक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ
- Zlatan Ibrahimovic: एज डजन्ट मॅटर! वयाच्या 41व्या वर्षानंतरही स्टार खेळाडू ज्लाटान इब्राहिमोविचस खेळणार फुटबॉल
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा