IND A Vs ENG A Live Streaming : मिशन इंग्लंडसाठी टीम इंडिया सज्ज! यशस्वी जैस्वाल, करुण नायर उद्या उतरणार मैदानात, सामना कुठे Live पाहू शकता? जाणून घ्या
When And Where To Watch IND A Vs ENG A 1st Unofficial Test : एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) च्या रंगतदार प्लेऑफ सामन्यांकडे लागलेले आहे.

England Lions VS India A Live Streaming : एकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) च्या रंगतदार प्लेऑफ सामन्यांकडे लागलेले असतानाच, दुसरीकडे भारताचा भविष्यकालीन कसोटी पिढी तयार करण्यासाठी भारत 'अ' संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरेल. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखालील इंडिया 'अ' संघाने इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला उद्यापासून सुरुवात करेल. यशस्वी जयस्वाल, करुण नायर सारखे खेळाडू भारताकडून या मालिकेत खेळताना दिसतील. पण, क्रिकेटप्रेमींना आता प्रश्न पडला आहे, हा सामना कुठे पाहता येणार?
थेट प्रक्षेपण कुठे पाहता येईल?
इंडिया अ विरुद्ध इंग्लंड लायन्स पहिला सामना ईसीबी वेबसाइट आणि अॅपवर स्ट्रीम केला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतातील कोणत्याही टीव्ही चॅनेलवर करण्यात येत नाही. सामना ECB (England and Wales Cricket Board) च्या अधिकृत संकेतस्थळावर ecb.co.uk आणि England Cricket अॅपवर मोफत स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल. इंडिया अ विरुद्ध इंग्लंड सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. पहिला सामना 30 मे ते 2 जून दरम्यान खेळला जाईल.
ही मालिका भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आहे. कसोटी क्रिकेटसाठी उभारल्या जाणाऱ्या बेंच स्ट्रेंथसाठी अशा मालिकांचा मोठा फायदा होतो. या मालिकेतील चांगली कामगिरी खेळाडूंना भारतीय मुख्य संघाच्या दारात आणू शकते.
MY INDIA A TEAM PLAYING XI AGAINST ENGLAND LIONS :
— VIKAS (@VikasYadav69014) May 29, 2025
Abhimanyu Easwarn (C)
Yashasvi Jaiswal
Ruturaj Gaikwad
Karun Nair
Sarfaraz Khan
Dhruv Jurel (WK)
Nitish Kumar Reddy
Shardul Thakur
Harshit Rana
Tanush Kotiyan
Akash Deep pic.twitter.com/HRxOhRRkRs
इंग्लंड लायन्स संघ : जेम्स रीव्ह (कर्णधार), फरहान अहमद, रेहान अहमद, सनी बेकर, जॉर्डन कॉक्स, रॉकी फ्लिंटॉफ, एमिलियो गे, टॉम हेन्स, जॉर्ज हिल, जोश हल, एडी जॅक, बेन मॅककिनी, डॅन मौसले, अजित सिंग डेल, क्रिस वोक्स, मॅक्स होल्डन
भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, दीपकुमार, दीपकुमार, दीपकुमार, आकाश कुमार, दीपकुमार, प्रसिद्ध कृष्णा, ऋतुराज गायकवाड, सरफराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे
हे ही वाचा -





















