(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ENG vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध 'ग्राहम थोर्प' यांची जर्सी घालून मैदानात उतरला 'बेन स्टोक्स', कारण काय?
ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही मालिका इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
ENG vs NZ: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही मालिका इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या मालिकेपासून इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. या मालिकेतून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचं संघात पुनरागमन झालंय. दरम्यान, नाणेफेकीसाठी मैदानात उतरलेल्या बेन स्टोक्स इंग्लंडचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक ग्राहम थॉर्पची जर्सी घालून मैदानात उतरला. परंतु, बेन स्टोक्स ग्राहम थोर्पची जर्सी घालून मैदानात का उतरला? यामागंचं कारण समोर आलंय.
ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ग्राहम थोर्पनं आपल्या पदाचा राजीनामा आणि आफगाणिस्तानच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळली. थोर्प हे सध्या गंभीर आजारानं ग्रस्त आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती थोर्पच्या नातेवाईकांनी दिली.
ट्वीट-
बेन स्टोक्सनं ग्राहम थोर्पची जर्सी का घातली?
या सामन्यात थॉर्पची जर्सी घालून स्टोक्सला संदेश द्यायचा आहे की या कठीण काळात इंग्लंडचा क्रिकेट संघ त्याच्या पाठीशी उभा आहे. थॉर्पनं इंग्लंडकडून 100 कसोटी सामन्यांमध्ये 16 शतके झळकावली आहेत. 2015 मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
इंग्लंड न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 2- 6 जून दरम्यान खेळला जात आहे. सामना लॉर्डच्या मैदानावर हा सामना सुरू आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 10-14 जून दरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 23- 27 जून दरम्यान खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-