(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरनं खरेदी केली मर्सिडीज, किंमत पाहून उडेल तुमची झोप
Mercedes-Benz G63 AMG SUV: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकात्याचा संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं मर्सिडीज खरेदी केली आहे.
Mercedes-Benz G63 AMG SUV: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघाचं नेतृत्व करणार अय्यरनं मर्सिडीज खरेदी केली आहे. या मर्सिडीजची किंमत 2.45 कोटी इतकी आहे. श्रेयसची एसयूव्ही डिलिव्हरी करतानाची छायाचित्रे मुंबईस्थित मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्सनं शेअर केली आहेत. त्याची जर्मन कार निर्मात्या कंपनीसोबत डीलरशिप आहे.
श्रेयस अय्यर महागड्या गाड्यांचा शौकीन
श्रेयस अय्यरला महागड्या गाड्यांचा खूप शौक आहे. त्याच्याकडं Lamborghini Huracan Supercar, Audi RS5 सारख्या इतर गाड्या आहेत. आयपीएल 2022 च्या आधी झालेल्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सनं 12 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. त्यानंतर त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. यापूर्वी श्रेयर अय्यर दिल्लीच्या संघाचा भाग होता. परंतु, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्लीच्या संघानं त्याला रिलीज केलं होतं.
आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरचं प्रदर्शन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात श्रेयस अय्यरनं 14 सामन्यात 30.85 च्या सरासरीनं आणि 134 च्या स्ट्राईक रेटनं 401 धावा केल्या आहेत. या हंगामात त्यानं तीन अर्धशतक झळकावली आहेत. 85 ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट राडयर्सच्या संघानं यंदाच्या हंगामात 14 सामन्यांपैकी केवळ सहा सामने जिंकले. गुणतालिकेत कोलकात्याचा संघ सातव्या क्रमांकावर होता.
श्रेयस अय्यरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
श्रेयस अय्यरनं आतापर्यंत चार कसोटी, 26 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 55.4 च्या सरासरीनं त्यानं 388 धावा केल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यात 41.2 च्या सरासरीनं 947 धावा केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 36.8 च्या सरासरीनं 809 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-