तब्बल 28 चौकारांसह 30 षटकार ठोकत 331 धावांची धमाकेदार खेळी, 13 वर्षाच्या भारतीय खेळाडूची कमाल
Mohak kumar smashes triple ton: दिल्लीच्या 13 वर्षाच्या मोहक कुमारने दमदार फलंदाजी करत एक स्वप्नवत खेळी खेळली. ड्रीम चेजर्स चषकात त्याने अंडर-13 वयोगटात 125 चेंडूत 331 धावा ठोकल्या आहेत.
नवी दिल्ली: भारतीयांसाठी सर्वात मुख्य, महत्त्वाचा आणि आवडता खेळ म्हटलं की क्रिकेट. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांमधून संघात खेळणाऱ्या काही खेळाडूंमध्ये काहीतरी विशेष असणार हे अवघ्या क्रिकेट जगताने मानलं आहे. त्यामुळे भारतात दर काही वेळेनुसार एका नव्या
टॅलेंटचा जन्म होतच असतो. नुकतंच दिल्ली येथेही 13 वर्षाच्या मोहक कुमारने (Mohak kumar) एक दमदार फलंदाजी करत एक अभूतपूर्व खेळी खेळली.
दिल्लीत सुरु असलेल्या ड्रीम चेजर्स चषकात दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमी आणि अँड्योरेन्स क्रिकेटर अकादमी यांच्यात सामना पार पडला. यावेळी दिल्ली कॅपिटल्स बाल भवन क्रिकेट अकादमीकडून चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या मोहक कुमारने 28 चौकार आणि 30 षटकार ठोकत एका शानदार खेळीचं दर्शन घडवलं. 13 वर्षाच्या मोहकने 137 मिनिटं फलंदाजी करत 264.80 च्या स्ट्राइक रेटने धावा बनवल्या. त्याने केलेल्या 331 धावांना शिवाई मलिक (67) आणि आर्यन भारद्वाज (40) यांची चांगली साथ मिळाली. ज्यामुळे त्यांनी 40 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या बदल्यात 576 रन केले.
178 धावांनी विजय
मोहाकच्या त्रिशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिट्लस बाल भवनने 576 धावा केल्या. ज्याच्या प्रतित्यूरात समोरचा संघ अँड्योरेन्स क्रिकेटर अकादमी 17.1 ओव्हरमध्ये 153 रनांवर सर्वबाद झाली. त्यांच्याकडून मेधांशने सर्वाधिक म्हणजे 53 चेंडूत 126 रनांची खेळी केली. तर वामनने 29 धावांच्या बदल्यात 5 आणि यतिनने 45 धावांच्या बदल्यात 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स बाल भवनने सामने 178 रनांनी जिंकला.
संबधित बातम्या
- IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
- BCCI नं खेळाडूंना हलाल मांस अनिवार्य केलं?, बोर्डानं दिलं स्पष्टीकरण
- Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha