एक्स्प्लोर

IND vs NZ: कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला रेकॉर्ड रहाणेच्या नावावर, पहिल्या कसोटीतही किवींना नमवणार? 

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला टी20 मालिकेत 3-0 च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. ज्यानंतर आता दोन्ही संघामध्ये कसोटी सामन्यांना सुरुवात झाली आहे.

कानपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात कानपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय केला आहे. सलामीवीर शुभमनने (Shubhman Gill) चांगल्या खेळीचे दर्शन घडवले असून भारताचा विजय होण्याची दाट शक्यता आहे. या विजयामागील कारण म्हणजे या कसोटीसाठी भारताचा कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). रहाणे एक असा भारतीय कसोटी कर्णधार आहे, ज्याने 5 पैकी 4 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. त्याच्या या रेकॉर्डमुळे भारत ही मालिकाही जिंकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय कसोटी संघाचा कायमस्वरुपी कर्णधार विराट कोहलीने नुकताच टी20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विश्रांती म्हणून न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही विश्रांती म्हणून कोहली संघात नसल्याने रहाणेला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दरम्यान रहाणेला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खास कामगिरी करता येत नसल्याने कसोटी क्रिकेट हा त्याच्यासाठी शेवटचा पर्याय असल्याने हा सामना त्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यात तो कर्णधारही असल्याने त्याच्यावर अधिक जबाबदारी आहे. पण त्याचा कर्णधार म्हणून आतापर्यंतचा रेकॉर्ड मात्र उत्तम असल्याने भारतीयासांठी ही एक दिलासादायक बातमी आहे. 

कर्णधार रहाणे आणि विजय

सर्वात आधी 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील चौथ्या टेस्टमध्ये रहाणेला कर्णधारपद मिळालं. त्यावेळी मालिकाही 1-1 च्या बरोबरीवर असल्याने मालिका विजयासाठी चौथी कसोटी भारताला जिंकण अनिवार्य होतं. यावेळी रहाणेने संघात जाडेजा आणि अश्विन यांच्यासह आणखी एक फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला संधी देण्याची युक्ती खेळला. ही युक्ती बरोबर ठरली कुलदीपने 4 विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी केली. ज्यामुळे रहाणेने कर्णधार म्हणून पहिला विजय मिळवत मालिकाहील भारताच्या नावावर केली. 

त्यानंतर आता अलीकडे 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताच्या मालिका विजयात रहाणेचा मोठा सहभाग होता. पहिल्या कसोटीत भारत पहिल्या डावात 36 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर तो सामना भारताने गमावला. पण नंतर दुसऱ्या कसोटीत रहाणेने कर्णधारपद सांभाळत शतकही ठोकलं आणि संघाला विजयही मिळवून दिला. तिसरी कसोटी ड्रॉ झाल्यानंतर चौथ्या कसोटीत रहाणेने संघाला विजय मिळवून देत मालिकेसह आपल्या कारकिर्दीतील कर्णधार म्हणून तिसरा कसोटी विजय मिळवला. ज्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही एक विजय मिळवला असून रहाणे सध्या कर्णधार म्हणून 6 वी कसोटी खेळत आहे. आतापर्यंतच्या रेकॉर्डमुळे रहाणे कर्णधार असताना संघ विजयी होण्य़ाची शक्यता इतर कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे.   

संबधित बातम्या

IND vs NZ 1st Test, Day 1 LIVE : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

BCCI नं खेळाडूंना हलाल मांस अनिवार्य केलं?, बोर्डानं दिलं स्पष्टीकरण

Cheteshwar Pujara On Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या फॉर्मबाबत चेतेश्वर पुजाराचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाला? 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget