Commonwealth Games 2022 : लवलिनाच्या तक्रारीचं अखेर निवारण, कोच संध्या गुरुंग यांना कॉमनवेल्थ खेळांसाठी मिळाली मान्यता
CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये माणसिक छळ होत असल्याचा आरोप लवलिना बोर्गोहेनने केल्यानंतर लगेचच यंत्रणा कामाला लागली असून आता लवलिनाच्या कोच संध्या यांना खेळांसाठी मान्यता मिळाली आहे.
Lovlina Borgohain in Commonweath games : भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहेनने (Lovlina Borgohain) कॉमनवेल्थ स्पर्धेपूर्वी (Commonweath games 2022) तिच्या प्रशिक्षकांना सोबत सरावादरम्यान न घेऊन जाण्यास मिळत असल्याने मानसिक त्रास होत असल्याचं सांगतिलं. ज्यानंतर या तक्रारीवर लगेचच अॅक्शन घेण्यात आली असून लवलिनाच्या प्रशिक्षक संध्या गुरुंग (Sandhya Gurung) यांना कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) साठी मान्यता (accreditation) मिळाली आहे. ''मला कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठीची परवानगी नुकतीच मिळाली असल्याची माहिती संध्या यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) कांस्य पदक मिळवणाथऱ्या लवलिनाने यंदा कॉमनवेल्थ खेळांमध्येही नक्कीच पदक मिळवणार असल्याचा विश्वास देखील जाहीर केला आहे. दरम्यान लवलिनाच्या कोचने देखील असाच विश्वाच दर्शवत सर्व खेळाडूंचा सराव चांगला सुरु आहे. पण अॅक्रेडेशन (accreditation card) कार्ड न मिळणं एक समस्या होती. पण आता अॅक्रेडेशन कार्डसह कॉमनवेल्थ खेळांसाठी मान्यता मिळाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Boxer Lovlina Borgohain's coach Sandhya Gurung gets accreditation for CWG 2022
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2022
Read @ANI Story | https://t.co/klESnBeWsW#LovlinaBorgohain #boxing #SandhyaGurung #CWG22 pic.twitter.com/D5OluVno7q
क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशनने त्वरीत घेतली दखल
सरावादरम्यान लवलिनाचा मानसिक छळ होत असल्याचा धक्कादायक खुलासा तिने ट्वीट करत केला होता. ज्यानंतर शासनाने लगेचच याची दखल घेत क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशनही कामाला लागलं असल्याचं आसाम ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस लक्ष्य कोंवर ( Lakshya Konwar) यांनी सांगतिलं होतं. लक्ष्य यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले होते की,'भारतीय बॉक्सिंग फेडरेशनच्या महासचिवांशी माझे बोलणे झाले, त्यातून मला कळाले की संबंधित प्रशिक्षकांचे नाव यादीत कधीच नव्हते. केवळ 33% सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील या प्रकरणाकडे लक्ष देत आहेत. क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशननेही हा मुद्दा उचलला आहे.'' आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला ताबडतोब लवलिना बोर्गोहेनच्या प्रशिक्षकांची लवकरात लवकर व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे,” असे ट्विट देखील क्रीडा मंत्रालयाने केले होते.
काय म्हणाली होती लवलिना?
कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games 2022) स्पर्धेपूर्वीच लवलिनाने एक मोठा खुलासा करत तिचा मानसिक छळ सुरु असल्याचं सांगितलं आहे. 'मला पदक मिळवून देण्यात ज्या प्रशिक्षकांनी मोलाची मदत केली, त्यांना सतत बदललं जात आहे. कॉमनवेल्थ विलेजमध्ये देखील यायला देत नसून त्यांना सतत त्याठिकाणाहून बदलत असल्याने मला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. लवलिनाने ट्वीटरवर पोस्ट करत ही सर्व माहिती दिली आहे. यावेळी तिने तिची प्रशिक्षक संध्या गुरुंगजी (Sandhya Gurung) हीला द्रोणाचार्य अवार्ड देखील मिळालं आहे. पण असं असतानाही माझ्या दोन्ही प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी हजारदा हात जोडून विनंती केल्यानंतर उशिराने सोडलं जातं. या सर्वाचा माझ्या खेळावरही परिणाम होत आहे. स्पर्धेला 8 दिवस असताना असं सगळं होत असून याशिवाय माझ्या एका प्रशिक्षकाला भारतात पुन्हा पाठवण्यात आलं आहे. या सगळ्यानंतर मी खेळावर कसं फोकस करु हे कळत नाही. पण आशा आहे या साऱ्यानंतरही मी देशासाठी पदक मिळवून देईन.
— Lovlina Borgohain (@LovlinaBorgohai) July 25, 2022
हे देखील वाचा-
- Lovlina Borgohain : लवलिनाच्या आरोपांची त्वरीत दखल, क्रीडा मंत्रालयासह कॉमनवेल्थ फेडरेशन कामाला
- Lovlina Borgohain on Twitter : 'माझा मानसिक छळ सुरु आहे,' ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीनाचा मोठा आरोप, म्हणाली...
- Commonwealth Games 2022 : खेळाडूंना मानसिक तणावाशी सामना करण्यासाठी ट्रेनिंग द्यायला हवी; कॉमनवेल्थचं तिकीट मिळाल्यानंतर निखत जरीनचं वक्तव्य