एक्स्प्लोर

Cheteshwar Pujara 65th Century: चेतेश्वर पुजाराने झळकावले 65 वे शतक; लॉर्ड्सच्या मैदानावरुन निवड समितीला दिलं प्रत्युत्तर

Cheteshwar Pujara 65th Century: चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे, मात्र असे असतानाही तो सतत क्रिकेट खेळताना दिसतो. 

Cheteshwar Pujara 65th Century: भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) आपले 65 वे प्रथम श्रेणी शतक झळकावले. लंडनच्या लॉर्ड्सच्या मैदानावर चेतेश्वर पुजाराने हे शतक झळकावले. सध्या तो इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू 2024 मध्ये खेळत आहे. चेतेश्वर पुजारा गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे, मात्र असे असतानाही तो सतत क्रिकेट खेळताना दिसतो. 

चेतेश्वर पुजारा काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन-2 मध्ये ससेक्सकडून खेळत आहे. या स्पर्धेत मिडलसेक्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात चेतेश्वर पुजाराने शतक झळकावले, जे त्याचे 65 वे प्रथम श्रेणी शतक होते. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने आपले शतक पूर्ण केले. चेतेश्वर पुजाराने केवळ चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. (PUJARA SMASHED HIS 65th FIRST-CLASS HUNDRED)

भारतीय संघात स्थान मिळत नाही-

चेतेश्वर पुजारा प्रामुख्याने टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळतो. मात्र गेल्या काही काळापासून तो कसोटी संघात स्थान मिळवू शकलेला नाही. चेतेश्वर पुजाराने भारतासाठी शेवटची कसोटी 7 जून 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम कसोटी होती. त्यानंतर 36 वर्षीय चेतेश्वर पुजाराला टीम इंडियात स्थान मिळू शकले नाही. जरी टीम इंडियाने अनेक कसोटी सामने खेळले आहेत. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफीमध्येही भाग घेतला होता. मात्र यानंतरही त्याला टीम इंडियाच्या संघात स्थान मिळाले नाही. 

चेतेश्वर पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द-

भारतासाठी एकदिवसीय आणि कसोटी खेळलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑक्टोबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुजाराने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरूमध्ये खेळला. पुज्जीने आतापर्यंत 103 कसोटी आणि 05 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 43 डावांत फलंदाजी करताना त्याने 44.36 च्या सरासरीने 7195 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके केली, ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 206* धावा होती. पुजाराने कसोटीत 863 चौकार आणि 16 षटकार मारले. याशिवाय त्याने 5 एकदिवसीय डावात 51 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्यासोबतच्या घटस्फोटाचा प्रश्न; नताशाने दिले 4 शब्दात उत्तर, काय म्हणाली?, पाहा Video

IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!

Shikhar Dhawan Mithali Raj: मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार?; स्वत: शिखर धवनने केला खुलासा, काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Embed widget