एक्स्प्लोर

Shikhar Dhawan Mithali Raj: मिताली राजसोबत लग्नबंधनात अडकणार?; स्वत: शिखर धवनने केला खुलासा, काय म्हणाला?

Shikhar Dhawan: शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली.

Shikhar Dhawan: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवनची (Shikhar Dhawan) क्रिकेट कारकीर्द आता अधोगतीकडे वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही आणि आता त्याला संधी मिळण्याची शक्यताही नाहीय.  

आयपीएल 2024 च्या हंगामात शिखर धवनला पंजाब किंग्स संघाची कर्णधारपदाची धुरा देण्यात आली होती. परंतु हंगामाच्या मध्यात दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यायला लागली. सध्या क्रिकेटपासून दूर असलेला शिखर धवन त्याच्या शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये धवनने स्वतःशी संबंधित एका अफवेबद्दल खुलासा केला.

शिखर धवन नेमकं काय म्हणाला? (Shikhar Dhawan On Mithali Raj marriage rumours)

कर्णधार शिखर धवनने सांगितले की, त्याने एकदा एक अफवा एकली होती की, तो भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत (Mithali Raj) लग्न करत आहे. धवनने सांगितले की, ही त्याच्याबद्दलची एक विचित्र अफवा होती. दरम्यान, महिला क्रिकेटची दिग्गज खेळाडू मिताली राज हिने निवृत्तीनंतर समालोचन आणि मेंटरशिपमध्ये दुसरी इनिंग सुरू केली आहे. मिताली राज महिला प्रीमियर लीगमधील गुजरात जायंट्सची मार्गदर्शक आहे.

धवनने ऋषभ पंतचे केले कौतुक-

धवनने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत याचेही कौतुक केले, ज्याने 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात शानदार पुनरागमन केले आहे. धवन म्हणाला, 'अपघातानंतर ऋषभ पंतने ज्या प्रकारे पुनरागमन केले आणि दुखापतींना हाताळले त्याचे मला कौतुक करायचे आहे. त्याने दाखवलेली सकारात्मकता आणि ताकद अप्रतिम आहे. तो परत आला, आयपीएल खेळला आणि भारतीय संघात सामील झाला हे अविश्वसनीय आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे, असं शिखर धवनने सांगितले.

IPL 2024 मध्ये धवनची कामगिरी कशी होती?

आयपीएल 2024 बद्दल बोलायचे झाले तर, धवनचा संघ हंगामाच्या सुरुवातीला वाढवलेल्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही आणि 10 संघांच्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर राहिला. धवन या मोसमात केवळ 5 सामन्यात मैदानावर उतरू शकला ज्यामध्ये त्याने 30.40 च्या सरासरीने आणि 125.61 च्या स्ट्राइक रेटने 152 धावा केल्या.

शिखर धवन अन् आयशाचा घटस्फोट-

शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात असतानाही त्यावर बरीच चर्चा झाली. धवन आणि आयशा यांचा ऑक्टोबरमध्ये घटस्फोट झाला. नऊ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि आयशा मुखर्जी नऊ वर्षापूर्वी  2012 साली विवाहबंधनात अडकले होते. धवन आणि आयशा यांना एक मुलगा असून त्याचे नाव जोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा दहा वर्षाने मोठी आहे. आयशाचा हा शिखर धवनशी दुसरा विवाह होता. आयशाला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

संबंधित बातम्या:

Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिक पांड्याचे वासे फिरले! पोटगी म्हणून नताशाला 70 टक्के संपत्ती देणार?, घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

IPL 2024 Hardik Pandya: हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; कुठून किती कमावतो?, जाणून घ्या...!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटलीSpecial Report Girl Safety : सांगली आणि बुलढाण्यात चिमुरड्यांवर अत्याचार, नराधमांना कधी वचक बसणार?Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोडSpecial Report Shiv Sena Thackeray Vs Shinde : शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' ठाकरेंची झोप उडवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
Embed widget