Chetan Sharma Resign : BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा, स्टिंग ऑपरेशननंतर घेतला मोठा निर्णय
BCCI Chief Selector Chetan Sharma Resign : क्रिकेट विश्वातील मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे.
BCCI Chief Selector Chetan Sharma Resign : क्रिकेट विश्वातील मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआय (BCCI) बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष (BCCI Chief Selector) चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव (BCCI Secretary) जय शाह (Jay Shah) यांच्याकडे सुपूर्द केला असून जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
स्टिंग ऑपरेशननंतर घेतला मोठा निर्णय
दरम्यान, अलीकडेच चेतन शर्मा यांच्यावर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) केले होते, अनेक बाबी समोर आल्या होत्या. यादरम्यान चेतन शर्मा यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादापासून ते खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंजेक्शनच्या वापरापर्यंतची अनेक धक्कादायक माहिती उघड केल्याचं समोर आलं होतं.
BCCI chief selector Chetan Sharma resigns from his post. He sent his resignation to BCCI Secretary Jay Shah who accepted it.
— ANI (@ANI) February 17, 2023
(File Pic) pic.twitter.com/1BhoLiIbPc
व्हायरल व्हिडीओमध्ये यांच्याकडून अनेक धक्कादायक वक्तव्यं
BCCI निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्यं केली होती. यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली होती. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दरम्यान, बीसीसीआयकडून कारवाई होण्याआधीच चेतन शर्मा यांनी पदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चेतन शर्मा यांनी BCCi च्या सचिवांकडे दिलेला राजीनामा मान्य करण्यात आल्याची माहिती एएनआय (ANI) वृत्तसंस्थेना दिली आहे.
बीसीसीआयच्या कारवाई आधीच राजीनामा
चेतन शर्मा यांच्यावर वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल होताच बीसीसीआयकडून याबाबत कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्यासंदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर क्रिकेट प्रेंमींना मोठा धक्का बसला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या