Shakib Al Hasan Retirement : कानपूर कसोटीपूर्वी क्रिकेट विश्वात मोठी घडामोड; शाकिब अल हसनने बांगलादेशी चाहत्यांना दिला धक्का, निवृत्तीची केली घोषणा
Shakib Al Hasan Announce Retirement : बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Shakib Al Hasan Announce Retirement : भारत आणि बांगलादेश यांच्यात शुक्रवारपासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. दोन्ही संघ कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये आमनेसामने येणार आहेत, मात्र त्याआधी बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मात्र, बांगलादेशी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, शाकिब अल हसनने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, मी मिरपूरमध्ये माझी शेवटची कसोटी खेळण्याची इच्छा मी बीसीबीकडे व्यक्त केली आहे. मी हे बीसीबीला सांगितले आहे, ते माझ्याशी सहमत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मीरपूर कसोटीनंतर या फॉर्मेटला अलविदा करणार आहे. तसे झाले नाही, तर कानपूरमधील भारताविरुद्धचा सामना हा माझा कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना असेल.
शकीब अल हसनसाठी चेन्नई कसोटी कामगिरी खराब राहिली. या कसोटीत शकीब अल हसनला एकही विकेट घेता आली नाही. पहिल्या डावात त्याने 32 आणि दुसऱ्या डावात 25 धावा केल्या. यानंतर शाकिब अल हसनच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तसेच, बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालने अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुखापतग्रस्त असूनही भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शाकिब अल हसनला प्लेइंग-11 चा भाग बनवण्यात आले.
2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शाकिब हा सर्व फॉरमॅटमध्ये 14,000 धावा आणि 700 विकेट्सची दुहेरी कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटर आहे. शाकिबने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 129 सामने खेळले असून एकूण 2551 धावा करण्यात तो यशस्वी ठरला आहे. शाकिबने टी-20 मध्ये 13 अर्धशतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यासोबतच शाकिबच्या नावावर टी-20 इंटरनॅशनलमध्ये 149 विकेट्स आहेत.
शाकिबने आतापर्यंत कसोटीत 70 सामने खेळून 4600 धावा केल्या आहेत. शाकिबने 5 शतके आणि 31 अर्धशतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. शाकिबने आतापर्यंत कसोटीत 242 विकेट्स घेतल्या आहेत.
हे ही वाचा -