IPL 2025 : लिलावाआधी चेन्नईच्या ताफ्यात मोठी खळबळ; 10 वर्षांनी धोनीच्या लाडक्या 'अण्णा'ची CSKमध्ये होणार एन्ट्री?
R Ashwin Possible Return In CSK : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवी अश्विनने चमकदार कामगिरी केली.
IPL 2025 Chennai Super Kings : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवी अश्विनने चमकदार कामगिरी केली. ज्यावेळी भारतीय संघ अडचणीत होता, त्यावेळी त्याने पहिल्या डावात शतक झळकावले. यानंतर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने 6 बळी घेतले. या चमकदार कामगिरीसाठी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मात्र, आता आर अश्विनशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. अश्विन पुन्हा एकदा त्या संघाच्या आयपीएल जर्सीमध्ये दिसू शकतो, जेथे त्याने आयपीएल करिअरची सुरुवात केली होती.
10 वर्षांनंतर आर अश्विन पुन्हा चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीत दिसणार का?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर अश्विन आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसू शकतो. जवळपास 10 वर्षांनंतर रवी अश्विन चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, अश्विनचा सध्याचा संघ राजस्थान रॉयल्स त्याला सोडणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर राजस्थान रॉयल्सने अश्विनला सोडले तर चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या जुन्या खेळाडूवर मोठी रक्कम खर्च करण्याची शक्यता आहे. मात्र राजस्थान रॉयल्सने अश्विनला सोडले नाही तर हा ऑफस्पिनर पुन्हा एकदा गुलाबी ड्रेसमध्ये खेळताना दिसणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या रडारवर मोहम्मद शमी...
मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चेन्नई सुपर किंग्ज भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोणत्याही किंमतीत आयपीएल लिलावात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपर किंग्स मोहम्मद शमीसाठी चांगली रक्कम खर्च करू शकते.
मात्र, चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल लिलावात मोहम्मद शमीवर आधीच बोली लावली होती, पण त्यांना यश आले नाही. सध्या मोहम्मद शमी गुजरात टायटन्सचा भाग आहे, परंतु असे मानले जाते की गुजरात टायटन्स मोहम्मद शमीला सोडू शकते.
चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल 2024 : एमएस धोनी (कर्णधार), मोईन अली, दीपक चहर, डेव्हन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथिशा पाथीराना, शेखर शेख, ए. रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान.
हे ही वाचा -