Year Ender 2022: कॅलेंडर वर्षात बाबर आझमच्या सर्वाधिक कसोटी धावा, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही
Year Ender 2022: कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासह इतर अनुभवी भारतीय फलंदाजांसाठी यंदाचं वर्ष चांगलं गेलं नाही.
Year Ender 2022: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासह इतर अनुभवी भारतीय फलंदाजांसाठी यंदाचं वर्ष चांगलं गेलं नाही. या वर्षी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही. कॅलेंडर वर्षात भारतासाठी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सर्वाधिक धावा केल्या. त्यानं सात सामन्यांच्या 12 डावात 61.81 च्या सरासरीनं 680 धावा केल्या आहेत. कॅलेंडर वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझम (Babar Azam) अव्वल स्थानावर आहे.
टॉप-5 खेळाडूंची यादी
1) बाबर आझम
बाबर आझम कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू ठरलाय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने यावर्षी सर्वाधिक कसोटी धावा केल्या. त्यानं 9 सामन्यात 69.64 च्या सरासरीनं 1 हजार 184 धावा केल्या. यादरम्यान बाबरनं चार शतकं आणि सात अर्धशतकं झळकावली.
2) जो रूट
या वर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 15 सामन्यात 45.75 च्या सरासरीनं 1 हजार 98 धावा केल्या. रूटनं पाच शतकं आणि दोन अर्धशतकं झळकावली आहेत.
3) उस्मान ख्वाजा
या यादीत ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्वाजानं 11 कसोटी सामन्यात 67.50 च्या सरासरीनं 1 हजार 80 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
4) जॉनी बेअरस्टो
कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप-5 मध्ये इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोचाही समावेश आहे. बेअरस्टोनं यावर्षी 10 कसोटीत 66.31 च्या सरासरीनं 1 हजार 61 धावा केल्या आहेत. बेअरस्टोनं या वर्षात सहा शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं.
5) मार्नश लाबुशान
कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा मार्नस लबुशाननं यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फलंदाजाच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. त्यानं 11 सामन्यात 56.29 च्या सरासरीनं 957 धावा केल्या. लबुशाननं चार शतकं आणि एक अर्धशतक मारलं आहे.
हे देखील वाचा-