एक्स्प्लोर

Virender Sehwag Tweets: ‘अब खेलने का नहीं, *** का टाईम है’ वीरेंद्र सेहवागचं ट्वीट ठरतंय चर्चेचा विषय

राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं.

IND vs SA: राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतानं 82 धावांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. दरम्यान, चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) दमदार कामगिरी केली. भारताच्या सलग दुसऱ्या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं एक मीम्स सोशल मीडियावर शेअर केलंय. या मीम्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.  

भारताच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागनं प्रसिद्ध वेबसीरिज ‘स्कॅम 1992’ मधील अभिनेता प्रतीक गांधीचा प्रसिद्ध डॉयलॉग शेअर केलाय. ज्यावर  “अब खेलने का नहीं *** का टाईम है.” असं लिहलंय. “आज पहिल्या हाफमध्ये डीके आणि त्यानंतर आवेश खान (Avesh Khan), ज्यांचे पहिले तीन सामन्यात विकेट न घेतल्यामुळं त्यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते, भारतीय संघानं शानदार विजय मिळवला", असंही वीरेंद्र सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलंय. 

वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-

 

तब्बल 16 वर्षानंतर दिनेश कार्तिकचं टी-20 मध्ये अर्धशतक
कार्तिक भारताच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा (1 डिसेंबर 2006) भाग होता. त्यानं जोहान्सबर्गमध्येच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ज्यामध्ये त्यानं 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी केली होती. पण 16 वर्षांनंतर कार्तिकने पहिले आणि सर्वात वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या 26 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कार्तिकनं 27 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 55 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 पेक्षा जास्त होता.

भारताचा 82 धावांनी विजय
या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेच्या संघानं नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सुरुवातीपासूनच ठराविक अंतरानं विकेट्स गमावणं सुरूच ठेवलं. दक्षिण आफ्रिकेकडून रासी व्हॅन डेर डुसेननं सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकेचा संपूर्ण संघ अवघ्या 87 धावांत ऑलआऊट झाला आणि भारतानं हा सामना 82 धावांच्या मोठ्या फरकानं जिंकला.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Cricketer Son Become Bollywood Actor: मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
मराठमोळ्या क्रिकेटरचा मुलगा, ज्याला मैदानानं नाहीतर, रुपेरी पडद्यानं खुणावलं; देव आनंदच्या फिल्ममधून डेब्यू, तर गाजलेल्या सिनेमात साकारली वडिलांचीच भूमिका
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?

व्हिडीओ

Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
India LPG Crisis: इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
इराणने भारतीय जहाजांना परवानगी दिली आहे का? परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'आम्ही तीन वेळा बोललो, परंतु आताच बोलणं घाईचं होईल..'
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
'नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब..' संसदेच्या प्रांगणात विरोधकांचा हल्लाबोल; राहुल गांधी म्हणाले, गॅस टंचाई ही फक्त सुरुवात, एपस्टीनचं नाव घेताच सभापतींनी बोलण्यापासून पुन्हा रोखलं
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Ashneer Grover On LPG: 'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
'टंचाई नक्कीच खरी असली पाहिजे! विरोधाभास बघा, श्री रामाकडेही सिलिंडर नाही' अशनीश ग्रोव्हरची देशातील इंधन टंचाईवर खोचक टिप्पणी
OBC Reservation : फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
फक्त पालकांच्या उत्पन्नावरून OBC क्रीमी लेयर ठरवता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Iran War Live Update: सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
सैन्याची बिनशर्त शरणागती सोडाच, इराणमध्ये नेतृत्व संपवून सत्तापालट सुद्धा शक्य नाही! ट्रम्प युद्ध गुंडाळण्याच्या तयारीत
Embed widget