एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

MS Dhoni Team : पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नईचा आयपीएल 2024 मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. चेन्नईला प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. चेन्नईच्या शेवटच्या सामन्यापारसून धोनीच्या आयपीएल करिअरबाबात चर्चा सुरु आहे. 

MS Dhoni : आयपीएल 2024 आता संपण्याच्या मार्गावर आहे, अखेरचे दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये चेन्नईचा (CSK) प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. चेन्नईला प्लेऑफमध्ये (Playoff) स्थान मिळवता आले नाही, त्यांच्या अखेरच्या साखळी सामन्यापासून एमएस धोनीच्या निवृत्तीबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. एमएस धोनी (Dhoni) आयपीएल 2025 मध्ये खेळणार का? या चर्चेने जोर धरला आहे. धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार, ही चर्चा जोर धरत असतानाच धोनीच्या फेसबूक पोस्टमुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 

धोनीने काय म्हटलेय ?

एमएस धोनीने आपल्या खास अंदाजामध्ये पोस्ट करत सस्पेन्स निर्माण केलाय. धोनीने फेसबूकवर केलेली पोस्ट मिनिटभरत वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. धोनी आपल्या पोस्टमध्ये नव्या टीमबाबत बोलत आहे. धोनी पोस्टमध्ये म्हणतोय की," योग्य निर्णय घेण्याची वेळ. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वतःची टीम सुरू करत आहे."

धोनीच्या या पोस्टचा अर्थ काय? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल. धोनी स्वत:ची आयपीएल टीम सुरु करणार आहे का? धोनी कोचिंगमध्ये करिअर सुरु करणार आहे? याबाबतच चर्चा सुरु झाली आहे. धोनीच्या पोस्टनंतर वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. पण अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

धक्कातंत्रामध्ये धोनी तरबेज - 

एमएस धोनी अचानक निर्णय घेतो. धोनी काय करणार, याची कुणालाही कल्पना नसते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेणं असो अथवा कसोटीचं कर्णधारपद सोडणं असो... धोनीने सर्वांनाच धक्का दिला होता. त्याशिवाय चेन्नईचं कर्णधारपद सोडत त्याने धक्कातंत्राचा वापर केला होता. त्यामुळे धोनी नेमका काय निर्णय घेणार, हे सांगणं कठीण आहे. 

एमएस धोनी सध्या 42 वर्षांचा आहे. आयपीएल 2025 वेळी धोनी 43 वर्षांचा होईल. त्यामुळे तो पुढील हंगाम खेळाडू म्हणून खेळण्याची शक्यता कमीच आहे. धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. निवृत्तीच्या चर्चा सुरु असतानाच धोनीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. 

एमएस धोनीचं IPL करियर

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये धोनीचं नाव घेतले जाते. धोनीने आयपीएलमध्ये पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. धोनीने 264 आयपीएल सामन्यात 5243 धावांचा पाऊस पाडलाय. त्यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaBJP Vidhan Sabha Winning plan Sanjay Bhende: बुथ टू बुथ मार्किंग;भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यशABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Mumbai: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या रात्रीपासून 22 तास 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Squid Game 2 Trailer: प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एन्ट्री; जीवघेण्या खेळात तगडा ट्विस्ट, मास्टरमाइंडचा खात्मा होणार?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
Embed widget