On This Day: वन मॅन शो! कपिल देवच्या ऐतिहासिक खेळीला 39 वर्ष पूर्ण, नाबाद 175 धावा करून वेधलं जगाचं लक्ष
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला.
1983 World Cup: माजी कर्णधार कपिल (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघावर मात करून भारतानं इतिहास रचला आहे. या विश्वषकातील साखळी सामन्यात कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीला आज 39 वर्ष पूर्ण झाली आहेत.
झिम्बॉब्वेविरुद्ध सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. सलामीवीर सुनील गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यांच्यानंतर मोहिंदर अमरनाथ (5 धावा), संदीप पाटील (1 धाव) आणि यशपाल शर्मा (9 धाव) यांनाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात फक्त 17 धावांवर भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. झिम्बाब्वेच्या केविन करन आणि पीटर रॉसन यांच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. या सामन्यात भारतीय संघ 50 धावाही करू शकणार की नाही? असं वाटू लागलं होतं. परंतु, त्यानंतर मैदानात आलेल्या कपिल देवनं संघाचा डाव सावरत 175 धावांची ऐतिहासिक खेळी करत भारताची धावसंख्या 250 पार पोहचवली. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं झिम्बॉव्वेच्या संघाला 235 धावांवर ऑलआऊट केलं. या सामन्यात भारतानं 31 धावांनी विजय मिळवला.
कपिल देवची नाबाद 175 धावांची खेळी कॅमेऱ्यात रेकार्ड नाही
1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती.
कपिल देव म्हणतात...
टेलिकॉम ऑपरेटरनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देव म्हणाले होते की, "मला लोकांवर टीका करायला आवडत नाही. लोक म्हणतात की, ते रेकॉर्ड झाले नाही याबद्दल तुम्हाला काही हरकत नाही? यावर मी नेहमी नाही म्हणतो. कारण ती खेळी आजही माझ्या मनात रेकॉर्ड आहे".
कपिल देव यांची क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांनी भारताकडून 1970 भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यांनी 1994 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आणि3 हजार 783 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये त्यांनी 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5 हजार 248 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs SA: 'पुढच्या सामन्यात उजव्या हातानं नाणं फेकणार' चारही सामन्यात नाणेफेक गमावलेल्या ऋषभ पंतची मजेदार कमेंट!
- Avesh Khan: राजकोट टी-20 सामन्यात चार विकेट्स घेऊन आवेश खानचं वडिलांना बर्थडे गिफ्ट!
- ENG vs NED: ...अन्यथा जोस बटलर ठरला असता टी-20 चा बादशाह! थोडक्यात वाचला एबी डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकार्ड