Happy Birthday Kapil Dev : कपिल देव यांचा तो रेकॉर्ड आजही आहे अबाधित, इतर खेळाडू आसपासही नाहीत...
Kapil Dev : भारताला पहिला-वहिला विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांचा आज 64 वा वाढदिवस आहे.
Kapil Dev Special Record : भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. पण कपिल यांचे काही असे विक्रम आहेत, जे आजपर्यंत जगातील कोणताही खेळाडू मोडू शकलेला नाही. कपिल देव यांचा आज 64 वा वाढदिवस असून यानिमित्ताने त्यांच्या एका खास रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ...
कपिल देव यांच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक विशेष विक्रम नोंदवला गेला आहे. जगातील कोणत्याही खेळाडूला अद्याप तो मोडता आलेला नाही. कपिल यांनी एका सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यांनी एका सामन्यात नाबाद 175 धावा केल्या. विशेष म्हणजे हा 1983 विश्वचषकातील सामना आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना भारतासाठी करो या मरो चा सामना होता. याच सामन्यात कपिल यांनी हा खास रेकॉर्ड करत संघाचं आव्हान कायम ठेवत एक आजवर अबाधित रेकॉर्डही नावे केला. कपिल देव यांच्याशिवाय या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू अँड्र्यू सायमंड्स दुसऱ्या स्थानावर आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने नाबाद 143 धावा केल्या.
धोनीही शर्यतीत
अनुभवी कपिल देव यांच्या या विक्रमाचे महेंद्रसिंह धोनीशी खास नाते आहे. कारण, वनडे फॉरमॅटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका सामन्यात सर्वाधिक धावा करणारा धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. तो जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने एका सामन्यात नाबाद 139 धावा केल्या. या बाबतीत, जोस बटलर जागतिक खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. बटलरने 129 धावा केल्या आहेत.
356 आंतरराष्ट्रीय सामन्यात 9 हजार 31 धावा करत 687 विकेट्स घेणारे महान अष्टपैलू कपिल यांना बीसीसीआयनंही खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
हे देखील वाचा-