(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cricket Records : 14 खेळाडूंनी कसोटीत गाठला 10 हजार रनचा टप्पा, भारतातील तीन दिग्गज खेळाडूंचा समावेश
Most Runs in Test : टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन काढल्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
10000 Runs in Test : कसोटीमध्ये पहिल्यांदा 10 हजार रनचा टप्पा 1987 मध्ये पूर्ण झाला होता. हा ऐतिहासिक विक्रम भारतीय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर आहे. सुनील गावस्करच्या आधी हा टप्पा गाठणं कोणत्याही फलंदाजाला शक्य झालेलं नव्हतं. अलिकडे यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुनील गावस्कर यांनी म्हटलं होतं की, पहिल्यांदा हा टप्पा गाटणं माऊट एव्हरेस्ट सर करण्यासारखं होतं. मात्र, त्याच्यानंतर 35 वर्षात आणखी 13 फलंदाजांनी हा मोठा आकडा गाठण्याची यशस्वी कामगिरी केली. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 14 फलंदाजांनी 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. हे फलंदाज कोण आहेत जाणून घ्या.
कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारे फलंदाज
- सचिन तेंडुलकर : 15921 (भारत)
- रिकी पाँटिंग : 13378 (ऑस्ट्रेलिया)
- जॅक कॅलिस : 13289 (दक्षिण आफ्रिका)
- राहुल द्रविड : 13288 (भारत)
- ॲलिस्टर कुक : 12472 (इंग्लंड)
- कुमार संगकारा : 12400 (श्रीलंका)
- ब्रायन लारा : 11953 (वेस्ट इंडिज)
- शिवनारायण चंद्रपॉल : 11867 (वेस्ट इंडिज)
- महेला जयवर्धने : 11814 (श्रीलंका)
- ॲलन बॉर्डर : 11174 (ऑस्ट्रेलिया)
- स्टीव्ह वॉ : 10927 (ऑस्ट्रेलिया)
- सुनील गावस्कर : 10122 (भारत)
- युनूस खान : 10099 (पाकिस्तान)
- जो रुट : 10015 (इंग्लंड)
कोणत्या संघाच्या किती फलंदाजांनी केलाय हा विक्रम
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक फलंदाजांनी 10 हजार धावा केल्या आहेत. या दोन्ही संघातील प्रत्येकी तीन-तीन खेळाडूंनी हा आकडा पार केला आहे. इंग्लंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजकडून प्रत्येकी दोन-दोन आणि दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी एका खेळाडूने हा आकडा गाठला.
संबंधित बातम्या