(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shocking: 'सचिनला आऊट नाही तर, जखमी करायचं होतं' शोएब अख्तरच्या वक्तव्यानं क्रिडाविश्वात खळबळ
भारत- पाकिस्तान यांच्यातील (India- Pakistan) क्रिकेट सामना क्रिडाविश्वातील सर्वात रोमहर्षक सामन्यांपैकी एक मानला जातो.
Shoaib Akhtar: भारत- पाकिस्तान यांच्यातील (India- Pakistan) क्रिकेट सामना क्रिडाविश्वातील सर्वात रोमहर्षक सामन्यांपैकी एक मानला जातो. ज्यावेळी या दोन्ही देशातील संघ एकमेकांच्या समोर येतात, तेव्हा-तेव्हा प्रक्षकांना नवीन काही पाहायला आणि अनुभवायला मिळतं. याआधीही अनेक सामन्यात दोन्ही देशात चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एका सामन्यादरम्यान मला सचिनला आऊट नव्हे तर जखमी करायचं होतं, असं शोएब अख्तरनं म्हटलंय. सचिनबाबत त्यानं केलेल्या धक्कादायक विधानानं क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2006 मध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात आली. या मालिकेतील एक सामना कराची येथे खेळण्यात आला होता. या कसोटीतच भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणनं सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. या मालिकेपूर्वी दोन्ही कसोटी सामने अनिर्णित ठरले. अखेरच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं भारताला 1-0 नं पराभूत करून मालिका जिंकली होती.
शोएब अख्तर काय म्हणाला?
शोएब अख्तर म्हणाला की, "कराची कसोटीत मला सचिन तेंडुलकरला बाद करायचं नव्हतं, तर त्याला दुखापत करायची होती. मी पहिल्यांदाच खुलासा करत आहे की, त्या कसोटी सामन्यात मला जाणूनबुजून सचिनला चेंडू मारायचा होता. सचिनला काहीही झाले तरी दुखापत झालीच पाहिजे, असा विचार करून तो त्या सामन्यादरम्यान मैदानात उतरला होता. आमचा कर्णधार इंझमाम मला सतत विकेटसमोर गोलंदाजी करायला सांगत होता. पण मी तसं केलं नाही. दरम्यान,मी सचिनच्या हेल्मेटला चेंडू मारला आणि माझा उद्देश पूर्ण झाला."
हे देखील वाचा-