NZ vs ENG : मैदानात दिसली जो रुटची 'जादूगिरी', हात न लावता उभी केली बॅट, पाहा Video
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जो रुटच्या खेळीच्या जोरावर जिंकला.
ENG vs NZ 1st Test Match : इंग्लंड आणि न्यूझीलंड (England vs New Zealand) यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडनं पाच विकेट्स राखून न्यूझीलंडचा पराभव केला. संघाचा माजी कर्णधार जो रुटच्या (Joe Root) दमदार खेळीच्या जोरावरच इंग्लंडने ही कमाल केली. दरम्यान रुटने नाबाद शतक सामन्यात ठोकलं, याशिवाय त्याने सामन्यात नॉन स्ट्राईकवर असताना एका वेळेस हात न लावता बॅट सरळ उभी केली होती. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना न्यूझीलंडचा काईल जेमिसन 23 वं षटक टाकत होता. त्यावेळी रूट नॉन स्ट्राईकवर उभा होता. यावेळी रन घेण्यापूर्वी रुटची बॅट त्याने टच न करता देखील अगदी सरळ उभी असल्याचं दिसून आलं. या व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत असून अनेकांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ -
जो रूटची दमदार खेळी
लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. एकेकाळी न्यूझीलंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेईल, असं वाटत असताना जो रूटनं संघाचा डाव सावरत इंग्लंडला विजय मिळवून दिला. रूटशिवाय कर्णधार बेन स्टोक्सनंही अर्धशतक झळकावलं. तर बेन फोक्सनं रुटसोबत चांगली भागीदारी करत संघासाठी 32 धावांचं योगदान दिलं.
जो रूटच्या नावावर खास विक्रम
इंग्लंडसाठी सर्वात जलद 9,000 धावा करण्याचा विक्रम जो रूटच्या नावावर आहे. आता 10 हजार धावांचा आकडा गाठत त्यानं आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात जो रूटनं त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 26 वं शतक पूर्ण केलं. इंग्लंडसाठी 10,000 हजार धावांचा आकडा पार करणारा तो दुसरा फलंदाज आहे. रुटनं आपल्या 118व्या कसोटीत ही कामगिरी केली. तर, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील 14वा फलंदाज आहे. याआधी अॅलेस्टर कूकनं इंग्लंडसाठी 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता.
हे देखील वाचा-