एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

FIFA : गोवेकर आणि क्रोएशियाचं कनेक्शन काय?

कोणताही संबंध नसताना गोव्यात क्रोएशिया समर्थक कसे निर्माण झाले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्यांच्या उत्तरासाठी 450 वर्षे मागे जावे लागेल.

पणजी : गोव्यात फुटबॉलप्रेमींची अजिबात कमतरता नाही. गोव्याला फुटबॉल पंढरी म्हणून देखील ओळखले जाते. पोर्तुगाल आणि ब्राझिलचे अनेक चाहते गोव्यात आहेत. फिफा विश्वचषकात यंदा क्रोएशियाने अंतिम फेरी गाठल्यानंतर गोवेकर क्रोएशिया समर्थक बनले आहेत. कोणताही संबंध नसताना गोव्यात क्रोएशिया समर्थक कसे निर्माण झाले असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्यांच्या उत्तरासाठी 450 वर्षे मागे जावे लागेल. क्रोएशियन पोर्तुगीजांच्या सोबत गोव्यात आले 450 वर्षे गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगीजांनी आपली जहाजे बनवून घेण्यासाठी क्रोएशियन लोकांना गोव्यात बोलावून घेतले होते. पोर्तुगीज काळात जुने गोवे हे सत्ता केंद्र होते. जुने गोवे येथून जेमतेम पाच किमी अंतरावर असलेल्या कुंभारजुवे आणि गवंडळी गावात तेथील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जहाज बांधणीची कामे सुरु केली. ही कामे करण्यासाठी आलेल्या क्रोएशियन लोकांनी गवंडळी गावात वास्तव्य केले होते. जवळपास 12 हजार क्रोएशियन लोक त्या काळी गवंडळी येथे वास्तव्याला होते. याच दरम्यान क्रोएशियन लोकांनी साव ब्राझ चर्च उभारले. त्यापूर्वी तेथे छोटे कपेल होते. क्रोएशीयात Dubrovnik येथे जसे चर्च आहे, त्याची हुबेहब प्रतिकृती गवंडळी येथे साकारण्यात आली आहे. त्या काळात या भागात वास्तव्यास असलेल्या हिंदू लोकांचे धर्मांतरण करण्यात आले होते. त्यामुळे आज देखील अनेक ख्रिश्चन धर्मीयांचे हिंदूंशी रक्ताचे नाते आहे. गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असल्याने पोर्तुगाल समर्थक फुटबॉल प्रेमी आहेत. त्याचबरोबर बरेच जण ब्राझिलचे देखील चाहते आहेत. क्रोएशियाने अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर गोव्यात असलेले क्रोएशिया समर्थक उजेडात आले आहेत. क्रोएशियाच्या विजयासाठी चर्चमध्ये प्रार्थना गवंडळी गावातील क्रोएशिया समर्थक सध्या जाम खुश आहेत. त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या क्रोएशियाचा संघ फीफाच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने सगळे समर्थक उत्साहीत झाले आहेत. रविवारची सुट्टी असल्याने उद्या सर्व जण टीव्हीवर फायनल पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. क्रोएशिया संघ फीफा वर्ल्ड कप जिंकावा म्हणून उद्या सकाळी सव्वा सात वाजता चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा होणार आहे. Zdravka Matisic या क्रोएशियाने या महिला अभ्यासकाने क्रोएशियाचे गोव्याशी असलेले संबंध जगासमोर आणले. दिल्ली येथे संस्कृत शिकण्यासाठी आलेल्या Zdravka हिने गवंडळी गावाला भेट देऊन दोन्ही देशांना जोड़णाऱ्या चर्चच्या दुव्याची माहिती जगासमोर आणली होती. 1999 मध्ये क्रोएशियाच्या शिष्टमंडळाने गोव्यात येऊन गवंडळी चर्चला भेट देऊन तेथील इतिहास जाणून घेतला होता. क्रोएशियन पर्यटक देखील अनेकदा या चर्चला भेट देत असतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget