एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ
मुंबई: इंग्लंडमध्ये एक ते 18 जून या कालावधीत आयोजित आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड आज होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघाची निवड करताना एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती एखादा धाडसी निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पण त्यापूर्वी बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ कसा असावा याबाबत, त्यांचा संघ जाहीर केला. त्यापूर्वी त्यांनी भारतीय संघाची निवड कशी होते याबाबतही माहिती दिली.
भारतीय संघनिवड कशी होते?
संघनिवडीची तारीख जाहीर होते, तेव्हा निवड समितीचा अध्यक्ष सर्वात आधी बीसीसीआय आणि फिजीओकडून संघाचा फिटनेस अहवाल मागवतो.
बीसीसीआयने करार केलेल्या सर्व खेळाडूंचा फिटनेस अहवाल त्यांच्याकडे असतो. त्यांच्याशिवाय निवड समिती अन्य दहा खेळाडूंची नावं त्यामध्ये वाढवू शकते. जसे सध्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारे नितीश राणा, ऋषभ पंत, अशांचीही नावं घेऊन त्यांचेही रिपोर्ट मागवले जातात. मग फिट-अनफिट कोण, उपलब्ध कोण, यांची नावं घेऊन जे उपलब्ध-फिट नाहीत, त्यांच्या नावावर खाट मारली जाते, असं संदीप पाटील यांनी सांगितलं.
त्यानंतर निवड समिती संघनिवडीसाठी बसते. त्यावेळी तुमचे आघाडीचे फलंदाज, मधल्या फळीतील फलंदाज, फिरकी गोलंदाज, वेगवान गोलंदाज, अष्टपैलू अशी निवड केली जाते. या चार विभागात खेळाडू विभागले जातात.
संदीप पाटील हे स्वत: भारतीय संघाकडून वन डे आणि कसोटी सामने खेळले आहेत. त्याशिवाय त्यांनी निवड समितीचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. तसंच कर्णधाराची कोणाला पसंती असू शकते, हे सुद्धा ते जाणतात, त्यामुळे त्यांनी निवडलेल्या संघाला पसंती मिळू शकते. एक-दोन खेळाडू इकडे-तिकडे होऊन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ कसा असू शकेल, याबाबत संदीप पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं.
संदीप पाटील यांनी निवडलेला संघ
सलामीवीर
- रोहीत शर्मा
- शिखर धवन
- अजिंक्य रहाणे
- विराट कोहली
- मनीष पांडे
- केदार जाधव
- महेंद्रसिंह धोनी
- हार्दिक पांड्या
- आर अश्विन
- रवींद्र जाडेजा
- भुवनेश्वर कुमार
- उमेश यादव
- जसप्रीत बुमराह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement