एक्स्प्लोर

Champions Trophy 2017: राहुलऐवजी कोण? 4 पर्याय

मुंबई: खांद्याच्या दुखापतीमुळं आयपीएलच्या दहाव्या मोसमातून माघार घ्यावी लागलेला टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तंदुरुस्त होण्याची शक्यता धूसर आहे. दस्तुरखुद्द राहुलनंच तो तंदुरुस्तीपासून खूप दूर असल्याची कल्पना दिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त होण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे माझ्या हातात काही नाही, असं सांगून तो म्हणाला की, सध्या तरी मी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी तंदुरुस्त होण्याची शक्यता खूप कमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुण्याच्या पहिल्या कसोटीत राहुलच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. ती दुखापत घेऊनच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळला. त्यानंतर राहुलच्या दुखापतग्रस्त खांद्यावर इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाली असून, त्याला किमान 2-3 महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. राहुलच्या जागी कोण? 4 पर्याय 4) गौतम गंभीर राहुलच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात सलामीवीर रोहित शर्माच्या सोबतीला कोण येणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्याकडे अनेक पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे गौतम गंभीर होय. गंभीर अनुभवी खेळाडू आहे. शिवाय सध्याच्या आयपीएलमध्ये तो फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. गंभीरने 6 सामन्यात 57.25 च्या सरासरीने 229 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकंही ठोकली आहेत. याशिवाय गंभीरने रणजी चषकातही दमदार कामगिरी केली होती. 3) दिनेश कार्तिक या स्पर्धेत तामिळनाडूचा अनुभवी खेळाडू आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकचं नावही चर्चेत आहे. कार्तिकने रणजी चषकात तब्बल 704 धावा ठोकल्या आहेत. याशिवाय 'लिस्ट ए' स्पर्धेत त्याने 12 डावात 854 धाव केल्या. कार्तिक आयपीएलमध्ये गुजरात लायन्सकडून खेळतो. या संघाचा तो हुकमी खेळाडू आहे. आयपीएलमधील कामगिरीमुळे तो टीम इंडियाचा दरवाचा ठोठावू शकतो. 2) शिखर धवन चार वर्षापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शिखर धवनने धडाकेबाज कामगिरी केली होती. मात्र चार वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. फॉर्म गमावलेल्या शिखर धवनला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून वगळलं होतं. मात्र आता धवन आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात परतण्याच्या तयारीत आहे. 1) ऋषभ पंत दिल्लीचा तरुण तुर्क आणि वादळी क्रिकेटपटू म्हणून नावारुपास आलेला ऋषभ पंत सध्या क्रिकेट वर्तुळात कमालीचा चर्चेत आहे. 19 वर्षीय ऋषभ पंतने रणजी असो वा सुरु असलेल्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे. पंतने रणजी चषकात अवघ्या 8 सामन्यात तब्बल 972 धावा ठोकल्या आहेत. रणजीत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. पंतच्या याच धडाकेबाज कामगिरीमुळे त्याची भारताच्या टी ट्वेण्टी संघातही निवड झाली होती. आयपीएलमध्ये पंत झहीर खानच्या दिल्ली संघाकडून खेळतो. विकेटकिपर असलेला पंत दिल्लीकडून सातत्याने धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्मासोबत ऋषभ पंत पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th T20 Live Score : वैभव सूर्यवंशीला डच्चू, नाणेफेक जिंकताच श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय; प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 4th T20 Live : वैभव सूर्यवंशीला डच्चू, नाणेफेक जिंकताच श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय; प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
India vs Pakistan : मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : पाकिस्तानी फलंदाजांनी कृणाल पांड्याला धू-धू धुतला, 23 चेंडूत संपवली मॅच; टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 4th T20I : तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
तीन सामने खेळल्यानंतर भुवनेश्वर कुमारला बाहेरचा रस्ता, वैभव सूर्यवंशीही OUT, न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-20 साठी भारताची Playing XI जाहीर
Mumbai Indians IPL 2026 : मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?
मुंबई इंडियन्सने रातोरात बदलला कोचिंग स्टाफ! आता बॅटिंग कोच म्हणून रॉबिन उथप्पाची नियुक्ती, नव्या कोचिंग स्टाफमध्ये कोणाकोणाला संधी?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
सारसबागेसमोर 3 दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी, नागरिकांना संशय, पोलिसांनी दार उघडलं, कुजून फुगलेला मृतदेह बघून सगळेच हादरले
Crime News: वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
वडिलांचा मृत्यू, मुलगा कॅनडावरून परतला, मुलीचंही शिक्षण पूर्ण झालं, अचानक कुटुंबातील तिघांनी संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?
Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Sanjay Gaikwad: मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
मोठी बातमी: शेतकऱ्यांबाबतचं 'ते' वक्तव्य भोवलं, एकनाथ शिंदे संजय गायकवाडांवर संतापले, शिवसेनेतून निलंबित करणार?
Navnath Ban and Nilesh Rane: अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
अरे नवनाथ बन, याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही, तू काय माझा मित्र नाहीस, निलेश राणे यांचा निर्णायक इशारा
Pune Crime News: पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याने दारु पिऊन गाडी चालवली, गाडी थेट फुटपाथवर चढवली, व्हिडीओ व्हायरल होताच निलंबनाची कारवाई
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
Embed widget