एक्स्प्लोर
टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी!
![टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी! Bcci Advertises For India Coach Role टीम इंडियासाठी प्रशिक्षक हवा... या आहेत बीसीसीआयच्या अटी!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/04121643/team-india-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: बीसीसीआयनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
सदर उमेदवाराला हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य मात्र नसेल, असंही बीसीसीआयनं नमूद केलं आहे. बीसीसीआयनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवताना नऊ मुद्दे मांडले आहेत. त्यापैकी सहाव्या मुद्यात म्हटलं आहे की, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवाराला आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव असणं, त्याचं संभाषणकौशल्य उत्तम असणं अनिवार्य आहे. त्याचं इंग्रजीवर प्रभुत्व असावं.
आपल्याला काय म्हणायचंय ते परिणामकारकरित्या खेळाडूंपर्यंत त्याच्याकडून अपेक्षित आहे. हिंदी तसंच अन्य भारतीय भाषांमध्ये संभाषण करणारा उमेदवार अधिक स्वीकारार्ह असेल. मात्र हिंदीत संभाषण करता येणं अनिवार्य नसेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)