एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पाकवर दणदणीत विजय
सिडनी : जोश हेझलवूड, स्टीव्ह ओ'कीफ आणि नॅथन लायनने पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 244 धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटीत 220 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा निर्विवाद विजय संपादन केला. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर विजयासाठी 465 धावांचं डोंगराएवढं मोठं आव्हान ठेवलं होतं.
त्यामुळे आदल्या दिवशी एक बाद 55 धावांवरून ही कसोटी अनिर्णीत राखायची, तर अझर अली आणि युनूस खान यांच्याकडून मोठ्या खेळींची अपेक्षा होती. पण जोश हेझलवूड आणि स्टीव्ह ओ'कीफने प्रत्येकी तीन, तर नॅथन लायनने दोन विकेट्स काढून पाकिस्तानचा दुसरा डाव 244 धावांत गुंडाळला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 220 धावांनी विजय साजरा करता आला.
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियातील सलग बारावा पराभव
सिडनी कसोटीतला पराभव हा पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला सलग बारावा पराभव ठरला. पाकिस्तानने 22 वर्षांपूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटी जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर पाकिस्तानला आजवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या कसोटी सामन्यात यजमानांना हरवता आलेलं नाही.
दरम्यान, सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला. वॉर्नरने पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक ठोकण्याची कामगिरी बजावली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ हा मालिकेतला सर्वोत्तम खेळाडू ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement