एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्यांदा बाबा
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला तिसऱ्यांदाही मुलगी झाली. त्याने आपल्या लेकीचं नाव 'इस्ला रोज' (Isla Rose Warner) असं ठेवलं आहे. सोशल मीडियावर त्याने बाळाचा फोटो शेअर करत ही माहिती दिली
मुंबई : विश्वचषकात खेळणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. वॉर्नरची पत्नी कँडीने एका मुलीला जन्म दिला. वॉर्नरने सोशल मीडियावरुन आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.
मुलीच्या आगमनामुळे आपण अत्यंत आनंदी झाल्याच्या भावना वॉर्नरने व्यक्त केल्या आहेत. वॉर्नरला याआधीही दोन्ही मुली आहेत. वॉर्नरने आपल्या पत्नी आणि तिन्ही मुलींचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नन्ह्या परीच्या आगमनामुळे मोठ्या बहिणींच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं सांगत वॉर्नरने #prouddad असा हॅशटॅगही दिला आहे. डेव्हिड वॉर्नरने आपल्या लेकीचं नाव 'इस्ला रोज' (Isla Rose Warner) असं ठेवलं आहे. बाळ आणि बाळंतीण दोघीही सुखरुप असल्याचं वॉर्नरने सांगितलं.
ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळवलं आहे. त्याचवेळी ही गुड न्यूज आल्यामुळे वॉर्नरचा आनंद द्विगुणित झाला आहे. साहजिकच त्याचे डोळेही घराकडे लागले आहेत. मात्र विश्वचषकाची मोहीम फत्ते केल्याशिवाय त्याला मायदेशी जाता येणार नाही. बॉल टॅम्परिंगच्या आरोपांमध्ये अडकल्यानंतर वॉर्नरवर क्रिकेट खेळण्यास एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्याचवेळी आपल्या वैयक्तिक जीवनात मोठे चढउतार आल्याचं वॉर्नर म्हणाला होता. पत्नीला जबर मानसिक धक्का बसल्यामुळे या काळात तिचा गर्भपात झाल्याचं वॉर्नरने सांगितलं होतं. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं आपलं पुनरागमन साजरं केलं. सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान वॉर्नरलाच देण्यात आला होता. सामनावीर किताबासाठी मिळालेलं स्मृतीचिन्ह त्याने एका चिमुरड्या चाहत्याला भेट देऊन जगभरातल्या क्रिकेट रसिकांची मनं जिंकली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement