एक्स्प्लोर
Advertisement
डॅरेन लेहमन ऑस्ट्रेलिया संघाचं प्रशिक्षकपद सोडणार?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याआधी लेहमन प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे.
सिडनी : बॉल टॅम्परिंगचा वाद संपता संपत नाही. स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. डेव्हिड वॉर्नरलाही ऑस्ट्रेलिया संघाचं उपकर्णधारपद सोडावं लागलं. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादमध्ये त्याच्या कर्णधारपदाबाबत अद्याप साशंकता आहे. या वादात आता ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्यावर गाज पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याआधी लेहमन प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. बॉल टॅम्परिंगच्या वादानंतर डॅरेन लेहमन प्रशिक्षकपद सोडू शकतात.
काय आहे प्रकरण?
ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला केपटाऊन कसोटीत चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेराने रंगेहाथ पकडलं. या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. हे पूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं.
स्टीव्ह स्मिथची कबुली
केपटाऊनमधल्या तिसऱ्या कसोटीत संघाच्या सीनिअर खेळाडूंनी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडूशी छेडछाड करण्याची परवानगी दिल्याचं स्टीव्ह स्मिथने मान्य केलं होतं.
यानंतर आयसीसीने स्मिथवर मॅच फीच्या 100 टक्के दंड आणि एका सामन्याची बंदी घातली आहे.
चेंडूशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर स्टीव्ह स्मिथने माफी मागितली. ''चेंडूशी छेडछाड केल्यामुळे आम्हाला फायदा होईल, असं वाटलं होतं. संघ व्यवस्थापनाला याची माहिती होती. मात्र प्रशिक्षकांचा यामध्ये सहभाग नाही. ही अभिमानाची गोष्ट नाही. माझ्या नेतृत्त्वात पुन्हा अशी चूक होणार नाही,'' असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला होता.
डॅरेन लेहमन संशयाच्या भोवऱ्यात
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चौकशी समिती आज जोहान्सबर्गमध्ये आपला निर्णय जाहीर करेल. कोचिंग स्टाफला बॉल टॅम्परिंगबाबत कोणतीही माहिती नव्हती, असा दावा स्मिथने केला होता. परंतु तरीही डॅरेन लेहमन संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
या संपूर्ण प्रकारानंतर प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी सार्वजनिकरित्या कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. पण कारवाईआधीच त्यांना प्रशिक्षकपद सोडायचं आहे, असं समजतं. 2019 च्या अॅशेस सीरिजपर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ होता.
मायकल क्लार्क पुन्हा कर्णधार?
तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या मते, या संपूर्ण प्रकरणात डॅरेन लेहमन तेवढेच दोषी आहे. मग भलेही त्यांना बॉल टॅम्परिंगची माहिती असो किंवा नसो.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 36 वर्षीय मायकल क्लार्कने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या नाइन नेटवर्कसाठी समालोचकाची भूमिका पार पाडतो आहे.
संबंधित बातम्या :
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार होणार?
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा, ऑस्ट्रेलिया सरकारचे आदेश
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
स्मिथ, वॉर्नर कर्णधार आणि उपकर्णधारपदावरुन पायउतार
IPL 2018: स्टिव्ह स्मिथऐवजी रहाणे राजस्थान रॉयल्सचा कर्णधार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement