VIDEO : भारत-पाकिस्तान सामन्यानंतरचे प्रेमळ क्षण, विराट कोहलीकडून हारिस रौफला ऑटोग्राफ असणारी जर्सी भेट
Virat Kohli Haris Rauf VIDEO : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 5 विकेट्सच्या फरकाने भारताने जिंकला. विशेष म्हणजे सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडू अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात वावरताना दिसले.
Asia Cup 2022, India vs Pakistan : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दोन्ही संघांनी आपआपला पहिला सामना एकमेंकाविरुद्ध खेळला. भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय मिळवला. दरम्यान सामन्यानंतर विराट कोहलीने देखील दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर विराटने पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफशी संवाद साधला आणि सोबतच त्याला स्वत:ची सही असणारी जर्सीही भेट दिली. दरम्यान दोघांच्या या भेटीयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बीसीसीआयने या दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये कोहली आणि रौफ एकमेंकाशी संवाद साधताना दिसत आहेत. संभाषणानंतर कोहलीने रौफला त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ देऊन भेट दिली. कोहलीच्या या कृतीने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. बीसीसीआयच्या या व्हिडिओला ट्वीटरवर काही वेळातच अनेकांनी लाईक केलं असून विविध कमेंट्सही केल्या आहेत.
The match may be over but moments like these shine bright ✨👌
— BCCI (@BCCI) August 29, 2022
A heartwarming gesture by @imVkohli as he hands over a signed jersey to Pakistan's Haris Rauf post the #INDvPAK game 👏👏#TeamIndia | #AsiaCup2022 pic.twitter.com/3qqejMKHjG
कसा पार पडला सामना?
सामन्यात आधी भारतानं (Team India) नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पाकिस्ताननं 147 धावा केल्या. यावेळी मोहम्मद रिझवानच्या (Mohammad Rizwan) 43 आणि इफ्तिकारच्या 28 तसंच दहानीच्या याच्या स्फोटक 16 धावा पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या ठरल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 तर हार्दिक पांड्याने 3, अर्शदीपने 2 आणि आवेश खाननं एक विकेट घेतली. त्यानंतर पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला केएल राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं 46 चेंडूत 49 धावांची भागेदारी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात रोहित शर्मा 12 तर, विराट कोहली 35 धावा करून बाद झाला.
यानंतर रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्यानं दमदार फंलदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले. दोघांमध्ये पाचव्या विकेट्ससाठी 52 धावांची भागेदारी झाली. अखेरच्या षटकात भारताला 7 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजा आऊट झालाय. परंतु, हार्दिक पांड्यानं विजयी षटकार ठोकून पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजन सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, नसीम शाहनं पदार्पणाच्या सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारताच्या दोन फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडलं. भारताचा पुढील सामना आता 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँग संघाविरुद्ध दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात होणार आहे.
हे देखील वाचा-